ST Bus Accident
sakal
उत्तर महाराष्ट्र
Jalgaon Accident : जळगावजवळ एसटी बसला भीषण अपघात! खिडकीत बसलेली महिला रस्त्यावर फेकली जाऊन बसच्या चाकाखाली चिरडली; एक ठार, अनेक जखमी
Tyre Burst Leads to Tragic ST Bus Accident Near Nashirabad : जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या अमळनेर आगाराच्या एसटी बसचे पुढील चाक फुटून बस नशिराबाद टोलनाक्याजवळ दुभाजक भिंतीवर आदळली. या अपघातात खिडकीतून रस्त्यावर फेकल्या गेलेल्या साराबाई गणेश भोई (वय ४६) या महिलेचा बसखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
जळगाव: शहरातून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे पुढील चाक फुटून प्रवाशांसह बस टोलनाक्याच्या दुभाजक भिंतीवर आदळली. ही घटना मंगळवारी (ता.२७) साडेबाराच्या सुमारास घडली. अपघातात बसमध्ये डाव्या बाजूच्या खिडकीत बसलेली महिला थेट रस्त्यावर फेकली जाऊन त्याच बसच्या मागील चाकात सापडून चिरडली गेली. साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसा, ता. यावल) असे मृत महिलेचे नाव आहे.
