जळगाव- शहरासह परिसरात व जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वादळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. या अर्धा-पाऊण तासाच्या धुवाधार वादळी पावसाने जळगाव शहर व ग्रामीण भागातील १४ वीज उपकेंद्रांना फटका बसला असून, संपूर्ण शहर व तालुक्यातील ग्रामीण भाग बुधवारी रात्रभर अंधारात होता. जळगाव शहरात ठिकठिकाणी दीडशेहून अधिक विजेचे खांब वाकले असून, काही तर जमिनीतून उखडले गेले आहेत. वृक्ष विजेच्या तारांवर कोसळून तारा तुटल्या आहेत.