Jalyukta Shivar Abhiyan 2.0 : 85 गावांतील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचेल पाणी

Jalyukta Shivar Yojana
Jalyukta Shivar Yojanaesakal

नंदुरबार : जलयुक्त शिवार अभियान १.० प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्ह्यातील ८५ गावांत जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. (Jalyukt Shivar Abhiyan 2 0 will be implemented in 85 villages of district nandurbar news)

पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. जिल्ह्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्चित व खंडित पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत राबविण्यात आली होती.

यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान १.० मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ४२३ गावांत एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ, शेतकरी तसेच सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्धरीत्या अंमलबजावणी करून जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार, जुन्या उपचारांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे घेऊन त्यांची यशस्वी अंमलबजावणी करून शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे.

आता जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल अशा ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत जिल्ह्यातील ८५ गावांत हे अभियान राबविण्यात येणार असून, त्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील २० गावे, नवापूर ६, शहादा १४, तळोदा ९, अक्राणी १७, तर अक्कलकुवा १९ अशा प्रकारे ८५ गावांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Jalyukta Shivar Yojana
Banana Crop Export : औरंगपूरला निर्यातक्षम केळी उत्पादन; एकाच दिवसात होते कोटींची उलाढाल

अशी होईल गावांची निवड

गावांची निवड करताना जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आदर्श गाव व इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेंतर्गत पूर्ण झालेली, तसेच कार्यान्वित असलेली गावे वगळता उर्वरित गावांपैकी पाणलोट कार्यक्रम अंमलबजावणीसाठी अवर्षणप्रवण तालुक्यातील गावे,

भूजल सर्वेक्षण विभागाकडील पाणलोट प्राधान्यक्रमानुसार गावे, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर यांचे पाणलोट प्राधान्य क्रमानुसार गावे, अपूर्ण पाणलोट, ग्रामसभेच्या मान्यतेने, लोकसहभाग, स्थानिक जिल्हा समितीने शिफारस केलेली तथापि पाण्याच्या ताळेबंदावर आधारित निकषांच्या आधारे गावांची निवड करण्यात येईल.

दृष्टिक्षेपात जलयुक्त शिवार २.०

-जिल्ह्यात राबविणार जलयुक्त शिवार अभियान २.०

-जिल्ह्यातील ८५ गावांचा समावेश

-जलयुक्त शिवार अभियान एकमध्ये ४२३ गावांमध्ये यशस्वीपणे अंमलबजावणी

-सर्वाधिक नंदुरबार तालुक्यातील २० गावांचा समावेश

-अक्कलकुवा १९, अक्राणी १७, शहादा १४, तळोदा ९ व नवापूर ६ गावांचा समावेश

Jalyukta Shivar Yojana
SAKAL Impact : बोगस बिले अडविण्याचे आव्हान! निधी खर्चात आघाडी, 97 टक्केहून अधिक खर्च

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com