आमदार भोळेंची "सुपारी' घेणारे अधिकारी आहेत तरी कोण? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

जळगाव : महापालिकेचे अधिकारी कामे करीत नाहीत, कोणतेही आदेश ऐकत नाही. त्यांनी माझी आमदारकी संपविण्याची सुपारीच घेतली आहे. अशी व्यथा जळगाव शहरातून दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जाहिरपणे मांडली. त्यामुळे जळगावातील ते दोन अधिकारी आहेत तरी कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

जळगाव : महापालिकेचे अधिकारी कामे करीत नाहीत, कोणतेही आदेश ऐकत नाही. त्यांनी माझी आमदारकी संपविण्याची सुपारीच घेतली आहे. अशी व्यथा जळगाव शहरातून दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जाहिरपणे मांडली. त्यामुळे जळगावातील ते दोन अधिकारी आहेत तरी कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
शहरात रस्त्याच्या गंभीर समस्या आहेत. शहरात सर्वत्र खड्डे आहेत. त्यातच अमृत योजनेचे काम अत्यंत दिरंगाईने सुरू असल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे. अनेकांना धुळीमुळे आजार झाले आहे. शिवाय खड्डयामुळे मणक्‍यांचे आजार होवू लागले आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील नागरिक आजच्या स्थितीत धुळ आणि खड्डेमय रस्ते यामुळे त्रस्त झाले आहेत. 

आमदारांचे महापालिकेवर ताशेरे 
जळगाव महापालिकेत भाजची सत्ता आहे. तर शहरात आमदारही भाजपचे आहेत. त्यामुळे जळगावकरांचा सारा रोष सत्ताधारी पक्षावर आहे. मात्र सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी शहराच्या विकासासाठी निधी आणल्याचा दावा केला आहे. राज्यात भाजपची सत्ता असतांनाच शहरात अमृत योजना मंजूर करून ती मक्तेदारामार्फत राबविण्यात आली. तसेच रस्त्यासाठी निधीही उपलब्ध करण्यात आला, तर भुयारी गटारीचाही मक्ता देण्यात आला आहे. मात्र या सर्व योजना राबविण्यात दिरंगाई होत असल्याचा त्यांचा दावा आहे. महापालिका जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे. शहरातील अमृत योजना राबविण्यात मक्तेदाराकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे शहरात खोदलेल्या रस्त्याची समस्या निर्माण झाली आहे. "अमृत' योजनेचे काम वेगाने करावे यासाठी महापालिकेतील अधिकऱ्यांना अनेक वेळा सूचना दिल्या. परंतु अधिकारी ऐकत नाही, मक्तेदारांशी साटेलोटे करून ते काम करीत नसल्याचा आरोप आमदार भोळे यांनी जिल्हा दक्षता समित्याच्या सभेत केला होता. 

आर्वजून पहा : शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये खडाजंगी !

हे आहेत ते दोन अधिकारी? 
आमदारकी संपविण्याची सुपारी घेण्याचा आरोप असलेले महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. ते अधिकारी आहेत तरी कोण? सुनील सूर्यकांत भोळे हे महापालिकेतील प्रभारी शहर अभियंता आहेत. बीई सीव्हील त्यांची पदवी असून सन 1991 मध्ये ते महापालिकेच्या सेवेत कनिष्ठ अभियंता पदावर रूजू झाले. त्यांनतर त्यांनी प्रकल्प विभागताही अभियंता पदावर काम केले. सन 2015 मध्ये सहाय्यक अभियंता व प्रभारी शहर अभियंता पदावर त्यांची पदोन्नती झाली. याच काळात त्यांकडे शहर अभियंता पदाचा प्रभारी कारभारही आला. त्यामुळे शहरातील रस्ते बांधकाम तसेच इतर कामांना मंजूरी देण्याचा अधिकार त्यांच्याकडेच होता. मात्र याच काळात अमृत योजनेलाही मंजूरी मिळाली मक्तेदारामार्फत त्याचे कामही सुरू झाले. या कामात दिरंगाई असल्याचा जनतेतून आरोप झाला. त्याबाबत तक्रारीही झाल्या परंतु भोळे यांनी काम वेगाने करण्याबाबत कोणतीही पाउले उचलली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज शहरात रस्त्याचा प्रश्‍न गंभीर बनलेला आहे.त्यामुळे प्रभारी शहर अभियंता असलेले भोळे यांना जबाबदार धरले जात आहे. 

पाणी पुरवठा अभियंता खडके 
आमदार भोळे यांनी आरोप केलेले दुसरे अभियंता डि. एस. उर्फ डिगंबर सखाराम खडके हे महापालिकेचे पाणी पुरवठा अभियंता आहेत. बीई सीव्हील त्यांची पदवी असून नगरपालिका असतांना 24 फेब्रुवारी 1986मध्ये ते महापालिकेत सहाय्यक अभियंता पदावर रूजू झाले.त्यानंतर 5 फेब्रुारी 2004 मध्ये महापालिकेत त्यांची बांधकाम अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याच काळात त्यांच्याकडे शहर अभियंतां पदाचा पदभार आहे. मात्र 23 मार्च 2017 ला त्यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला. त्याच्या जागेवर सुनिल भोळे यांची प्रभारीपदावर नियुक्ती करण्यात आली. खडके यांना पाणी पुरवठा अभियंता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.पाणी पुरवठा करणाऱ्या अमृत योजनेच्या कामाबाबतही त्यांच्याकडेच नियोजन आहे. त्यामुळे आमदारांनी त्यांच्यावरही कामात दिरंगाई केल्याचा आरोप केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jamgaon marathi news mla suresh bhole jmc Officer