'कटप्पाने बाहुबलीको क्‍यूं मारा..'चे उत्तर शोधतोय! 

Jayant Patil asks why did Baahubali killed Katappa
Jayant Patil asks why did Baahubali killed Katappa

जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा विरोधी पक्षात दरारा होता मात्र, सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिपदावर थेट घरी पाठविले. त्यामुळे आपणही विधानसभेत खडसेंना मंत्रिपदावरून हटविल्याबाबत "कटप्पाने बाहुबली को क्‍यो मारा?' असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.

जळगाव येथील निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत ते बोलत होते. सभेत जिल्ह्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. 

जयंत पाटील म्हणाले, भाजपचे नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे काम चांगले आहे, विरोधी पक्षात असताना त्यांचा दरारा होता. विधानसभेत ते आमच्यावर अगदी तुटून पडायचे आमच्यावर आरोप करून आम्हाला अंगावर घ्यायचे, निवडणुकीतही त्यांनी जोरदार प्रचार करून भाजपला निवडून आणले. परंतु सत्ता आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची खडसे यांच्यावर मर्जी खप्पा झाली आणि त्यांनी त्यांना थेट मुक्ताईनगरला पाठवून दिले. या कटप्पा-बाहुबलीच्या खेळात कट्टपाने बाहुबली क्‍यो मारा? असा प्रश्‍न आपण विधिमंडळात उपस्थित केला. मात्र आपल्याला अद्यापही त्या प्रश्‍नाचे उत्तर मिळालेले नाही. 

महाजनांकडून "मविप्र'वर सत्तेचा गैरवापर : पवार 
अजित पवार म्हणाले गिरीश महाजन यांनी "मविप्र'च्या राजकारणात सत्तेचा गैरवापर केला आहे. आमदार सतीश पाटील यांच्या वाढदिवसाची सभा संस्थेच्या मैदानावर घेण्यात आली त्याला आपण व एकनाथराव खडसे उपस्थित होतो. त्यात महाजन यांना बोलाविण्यात आले नाही. तर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे चंदुलाल पटेल यांच्याविरोधात मविप्र संचालक ऍड. विजय पाटील यांनी निवडणूक लढविली. त्यामुळे या दोन्ही गोष्टीचा राग येऊन त्यांनी मविप्र संचालक मंडळास काम करण्यास रोखले. विजय पाटील, विनोद देशमुख, सोनल संजय पवार यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आम्ही आमच्या काळात सत्तेचा असा गैरवापर कधीच केलेला नाही. 

शंभर कोटी लवकर द्या : भुजबळ 
छगन भुजबळ यांनीही जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेसाठी शंभर कोटी देण्याची घोषणा केली आहे, मात्र त्यांनी आता घरी जाण्याअगोदर हे शंभर कोटी द्यावेत. जळगावातील "मुजरा पार्टी' प्रकरणाचा उल्लेख करून ते म्हणाले, जळगावात पोलिसांवर मोठा दबाव आहे, अधिकारी सक्षम आहेत. त्यांनी 31 डिसेंबरच्या पार्टीवर कारवाई केली परंतु न्यायालयात जाण्याअगोदरच माणसे बदलली आणि नगाला नग देवून दुसरीच माणसे त्यात टाकली. हे कसे झाले हे सर्वांनाच माहीत आहे. गुलाबराव पाटील हे बोलण्यात वाकबार आहेत, मात्र त्यांचे काम मात्र तेवढ्या ताकदीचे नाही. 

पिस्तूल वाघासाठी अन चिडीमार : मुंडे 
धनंजय मुंडे म्हणाले जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांची तऱ्हाच वेगळी आहे. एक मंत्री इन करून ऐटीत पिस्तूल लावून फिरतात आम्ही त्यांना "पिस्तुल्या' म्हटले तर राग येतो. मात्र तेच पिस्तूल घेऊन ते वाघाला मारायला जातात. दुसरे मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात, अहो मला मंत्रिपदावर वाघ मारायचा आहे. परंतु मंत्रिपदाची चिडीमार बंदूक दिली आहे. 

पाटलांना फिरू देऊ नका : देवकर 
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, परभणी येथील सभेत पाटील यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडविली. अशा मंत्र्याला फिरू देवू नका, त्यांना जनतेने चौकात शेतकऱ्याबाबत प्रश्‍न विचारावेत आपण शेतकऱ्यांच्या सोबत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com