Dhule : समस्या जाणल्या; ‘रिझल्ट’ दाखवा!

A delegation of Civil Rights Protection Committee while giving a statement to Mayor Pradeep Karpe, Commissioner Devidas Tekale on Tuesday regarding civil problems in the Municipal Corporation.
A delegation of Civil Rights Protection Committee while giving a statement to Mayor Pradeep Karpe, Commissioner Devidas Tekale on Tuesday regarding civil problems in the Municipal Corporation.esakal

धुळे : महापालिकेत महापौरांसह अधिकारी आणि नागरी हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. २) संयुक्त बैठक झाली. तीत समितीने जनहिताशी निगडित सरासरी ३२ समस्यांची जंत्री मांडली.

ऐरवी समस्या, निरनिराळ्या तक्रारींचा सपाटा सुरूच असतो. त्यामुळे त्या महापालिकेला अवगत नाहीत असे नाही. परंतु, जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागरी हक्क संरक्षण समितीने जिव्हाळ्याच्या मांडलेल्या समस्या जाणून घेतल्यानंतर महापालिकेने आता ‘रिझल्ट’ दाखवावा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त झाली. (joint meeting of officials with mayor Dhule Municipality office bearers of civil rights protection committee dhule news)

शहर विकासाला आणखी दिशा मिळावी आणि धुळेकरांच्या मनातील ज्वलंत समस्या नागरी हक्क संरक्षण समितीने महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता कैलास शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी, काही नगरसेवकांसमक्ष मांडल्या.

समितीचे अध्यक्ष निवृत्त अधीक्षक अभियंता हिरालाल ओसवाल, सरचिटणीस महेश घुगे, निवृत्त अधीक्षक अभियंता प्रभाकर पाटोळे, सदस्य व धन्वंतरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश गिंदोडिया, ॲड. चंद्रकांत येशीराव, एस. टी. चौधरी, शरद शिंपी, योगेंद्र जुनागडे, प्रा. जसपाल सिसोदिया, जयेश बाफना, डॉ. संगीता गिंदोडिया, उमा घुगे, विजय अग्रवाल, नीलेश भावसार, प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते.

A delegation of Civil Rights Protection Committee while giving a statement to Mayor Pradeep Karpe, Commissioner Devidas Tekale on Tuesday regarding civil problems in the Municipal Corporation.
गणवीर करताय अमृत महोत्सवी सद्भावना पदयात्रा; राज्यभर भ्रमंती

शहरातील समस्यांची जंत्री

श्री. घुगे यांनी समस्या मांडल्या. त्यात शहरातील पाणीपुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करावे, आठ- दहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा अलीकडे आणावा, रात्री- अपरात्री पाणीपुरवठा न करता वेळेचे नियोजन करावे व दूषित पाणीपुरवठा तत्काळ बंद करावा, रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, रस्त्यांवरील दुतर्फा अतिक्रमण हटवावे, वाहतुकीला अडसर ठरणारे वीजेचे खांब हटवावे, गतिरोधक नियमाप्रमाणे करावे,

भूमीगत गटार योजनेबाबत वस्तुस्थिती जाहीर करावी, मोकाट विविध प्रकारच्या जनावरांना पायबंद घालावा, पाचकंदिलसह भाजी विक्री ठिकाणी स्वच्छतेवर भर द्यावा, आग्रा रोडवरील हॉकर्सची पर्यायी व्यवस्था करावी, हद्दवाढीतील गावांच्या समस्या सोडवाव्यात, नवीन बांधकाम परवानगी देताना वाहतुकीला अडसर होईल व अपघाताला निमंत्रण मिळेल अशा पद्धतीने रस्त्यावर टाकलेली वाळू, खडी, विटा टाकण्यास प्रतिबंध करावा,

सिग्नल सुरू करावे, महिलांसाठी देवपूरसह आवश्‍यक ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, घंटागाड्यांचे नियोजन करावे, टॉवर गार्डनचे बंद केलेले काम सुरू करावे, शाहू महाराज नाट्यमंदिराची दुरुस्ती करावी व एसी व्यवस्था सक्षम करावी, देवपूरमधील आदर्श सैनिक कॉलनीला जोडणारा रस्ता करावा, धोकादायक ठिकाणी मोबाईल टॉवरला प्रतिबंध करावा, एनएची परवानगी देण्याची कार्यवाही गतीने व्हावी आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या. महापौर, आयुक्तांनी सकारात्मक भूमिका दर्शवीत समितीच्या समस्यांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करू, अशी ग्वाही दिली.

A delegation of Civil Rights Protection Committee while giving a statement to Mayor Pradeep Karpe, Commissioner Devidas Tekale on Tuesday regarding civil problems in the Municipal Corporation.
Nandurbar : चोरीला गेलेली विहीर अखेर गवसली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com