Jawan Pravin Avhade passes away
sakal
नांदूरशिंगोटे - खंबाळे येथील भारतीय सैन्य दलातील जवान प्रवीण भाऊसाहेब आव्हाड (वय-३३) यांचे दोडी शिवारात झालेल्या अपघातात निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने त्या आनंदाचा क्षण कुटुंबीयांसमवेत साजरा करण्यासाठी ते गावी आले होते. मात्र, नियतीने घाला घातल्याने आनंदाचे वातावरण शोकात बदलले.