Kalika Mata Yatrotsav : चारच दिवसात 750 बैलांची विक्री; व्यापारी, खरेदीदारांची गर्दी

Bull market filled with Kalika Mata Yatra festival
Bull market filled with Kalika Mata Yatra festival esakal
Updated on

Nandurbar News : येथील कालिका मातेच्या यात्रोत्सवातील बैल बाजारात चार दिवसात ९०० बैलांची आवक होऊन ७५० बैलांची विक्री झाली. त्यातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. (Kalika Mata Yatrotsav 750 bulls were sold in 4 days in bull market nandurbar news)

त्यामुळे बैल घ्यावेत तर कालिका मातेच्या यात्रेतच हा लौकिक आजही कायम आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी बैल बाजारात एकच गर्दी केली आहे.

येथील यात्रा मृग नक्षत्र लागून खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीची सर्वात मोठी यात्रा असल्याने खरिपासाठी लागणारे कृषी पूरक साहित्य व खराखुरा मित्र असलेला सर्जा राजा अर्थात बैल घेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर येत असतात.

सातपुड्यातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर बैलांची खरेदी विक्री करीत असतात. त्यातून पुढील हंगामात शेती करणे सोपे जाते. त्यामुळे येथील बैल बाजारातील बैलांना मोठी मागणी असते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Bull market filled with Kalika Mata Yatra festival
MLA Satyajeet Tambe : दुग्धव्यवसायाकडे तरुणांनी संधी म्हणून पहावे; आमदार सत्यजित तांबे

केवळ चारच दिवसात येथे ९०० बैलांची आवक झाली व ७५० बैलांची विक्री होऊन १ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील बैल बाजारात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

खानदेशात यात्रा प्रसिद्ध

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तापासून सुरू होणारी ग्रामदैवत कालिका मातेची यात्रा येथील बैल बाजार, मसाल्याचे पदार्थ, कृषी पूरक साहित्य व संसारोपयोगी साहित्य खरेदीविक्रीसाठी संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशातील व्यापारी व खरेदीदार मोठ्या संख्येने यात्रेत गर्दी करतात.

Bull market filled with Kalika Mata Yatra festival
Nashik News : जामुंडे गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प; तालुका पर्यावरण मंडळाचा उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Student Vaishnavi Kumbhar Inspires by Preserving Family Clay Art Tradition Alongside MBBS Studies in Pune
Pune Palkhi bull attack
Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Latur Farmer Gets Sick Bull as Govt Aid
Marathi News Esakal
www.esakal.com