
खानदेशातील उत्पादक सुबाभूळ शेतीकडे
कापडणे : खानदेशात शेती करणे कठीण होत चालले आहे. मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. जे मिळत आहेत. ते कमी वेळेत अधिक रोजंदारी घेतात. शेतीमालालाही पुरेसा भाव नाही. अशा स्थितीत शेती करायची कशी, अशी जटिल समस्या निर्माण होत चालली आहे. आता बिगर खर्चिक आणि बिगर मजुरांशिवाय शेती करता येईल का, याची चाचपणी शेतकरी घेत आहेत. यातूनच सुबाभूळ शेतीकडे वळणार आहेत. एकरी लाखावर उत्पादन मिळते. कंपनी जागेवर खरेदी करण्यासाठी येते. खानदेशात सुबाभूळ शेतीचे क्षेत्र आगामी काळात वाढणार आहे.
धुळे, जळगाव व नंदुरबारमधील शेतकरी गुजरातमधील कागद कंपनींना भेट देत आहेत. सुबाभूळ शेतीची तंत्रे समजून घेत आहेत. यातसुबाभूळ झाड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर लावता येते. सुबाभूळ (सी पी एम ३२) ही वेगाने वाढणारी एक प्रजाती आहे. जी केवळ १८ महिन्यांत परिपक्व होते. सुबाभूळ नायट्रोजन वाढवणारे आहे, हे भविष्यात जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवते. अधिक उत्पादनासाठी कंपनीकडून उच्च दर्जाचे क्लोनल बियाणे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले आहे. क्लोनल रोपे मिळू शकतात लाकूड (उभ्या झाडांच्या अवस्थेत) तीन हजार सहाशे प्रति टन किंवा त्यावेळची वाढलेली किंमत किंवा बाजारभाव जे जास्त असेल ते त्या किमतीत विकत घेतले जाणार आहे.
लाकूड तोडणी, वाहतूक आदींचा खर्च कंपनी करणार आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार झाडे लावल्यास आणि शेतीसारखी काळजी घेतल्यास १८ महिन्यांनी सिंचन पद्धतीने ३०-४० टन प्रति एकर उत्पादन घेता येते. दरम्यान खानदेशातील विजय वाणी, विश्वप्रताप सिंग, भानू पाटील, गोकूळ धुळे, आर.एन. पाटील, भगवान पाटील, हंसराज पाटील, संजय नारायण, किरण जाधव, दत्ता धुमाळ, मनोज ललवाणी, भय्यासाहेब सोनवणे आदींनी पेपर कंपनींना भेट दिली.
चारा म्हणून उपयुक्त
सुबाभूळच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असल्यामुळे जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादन वाढते. लागवड करणारे शेतकरी सर्व वेळ इतर कामात वापरू शकतात.
''सुबाभूळ लागवडीनंतर फारसा खर्च न करता ८-९ वर्षे दर १८ महिन्यांनी चार ते पाच पिके घेऊ शकता. सुबाभूळ कापणी, वाहतूक आणि विक्रीसाठी वनविभागाची परवानगी किंवा पास आवश्यक नाही. सुबाभूळ लागवड करणारे शेतकरी लाकूड तोडण्यासाठी कंपनीशी लेखी करारही करू शकतात.''
- भगवान पाटील, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना, धुळे
Web Title: Khandesh Productive Towards Subsistence Farming Purchased From A Company In Gujarat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..