खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे कला महोत्सव!

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे नुकताच भामेर शिवारातील म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात एकदिवसीय कला महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय भजन-गायन स्पर्धाही संपन्न झाली. म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

निजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे नुकताच भामेर शिवारातील म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात एकदिवसीय कला महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय भजन-गायन स्पर्धाही संपन्न झाली. म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

व्यासपीठावर खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, प्रदेश महासचिव नानाभाऊ वाघ, प्रदेश उपाध्यक्ष फुला गवळे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत कुवर, महिला अध्यक्षा शोभाताई खैरनार, उपाध्यक्षा हर्षाबाई चौधरी, सचिव सरुबाई महाजन, प्रा. भगवान जगदाळे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कला महोत्सव व भजनगायन स्पर्धेचे उदघाटन झाले. साक्री तालुका वारकरी मंडळातर्फे प्रमुख अतिथींचा सत्कार झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, महिला अध्यक्षा शोभाताई खैरनार, प्रा. भगवान जगदाळे, लक्ष्मीकांत शाह आदींनी मनोगत व्यक्त केले. अनिल जगताप यांनी शासनाने जिल्ह्यातील दिडशेवर वयोवृद्ध कलावंतांना मानधन सुरू केल्याबद्दल शासनाचे जाहीर आभार मानले व आगामी काळात वारकरी मंडळासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहनही केले. लक्ष्मीकांत शाह यांनी भविष्यात तालुक्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी व शासनामार्फत वारकरी मंडळासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन दिले. शोभाताई खैरनार यांनी मानधन योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यातील पात्र कलावंतांना शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही केले.

कला महोत्सव व भजन गायन स्पर्धेत सुमारे 25 कलापथके, भजनी मंडळे व महिला भजनी मंडळे सहभागी झाले होते. त्यात माळमाथा परिसरातील निजामपूर येथील गुरुमाऊली भजनी मंडळ, जैताणेतील संत सावता भजनी मंडळ, अहिल्यादेवी भजनी मंडळ, संत सावता प्रभात फेरी महिला मंडळ, भामेर येथील संत सावता भजनी मंडळ, गोपालकृष्ण भजनी मंडळ, खुडाणे येथील संत सावता भजनी मंडळ, संत सावता महिला भजनी मंडळ तसेच सप्त पाताळेश्वर भजनी मंडळ (वासखेडी), कृष्णराज भजनी मंडळ (रुणमळी), गुरुमाऊली भजनी मंडळ (चिपलीपाडा), विठ्ठल भजनी मंडळ (डोमकानी), भातूजी महाराज भजनी मंडळ (बासर), गणेश भजनी मंडळ (दुसाणे), गुरुदत्त भजनी मंडळ (वर्धाने), खंडोजी भजनी मंडळ (भडगाव), गोंधळी भजनी मंडळ (सालटेक), जय मल्हार भजनी मंडळ (दिवाळयामाळ), महादेव पार्वती भजनी मंडळ (मळगाव), सिद्धेश्वर भजनी मंडळ (चिकसे), संत नागेश्वर भजनी मंडळ (दातर्ती), ज्ञानेश्वर भजनी मंडळ (शेवाळी), गोंधळी भजनी मंडळ (महिर), भारुडकार त्र्यंबक महाराज जगदाळे (नेर) व बालकलाकार अनुराग जगदाळे (निजामपूर-जैताणे) आदी कलावंत व भजनी मंडळांचा समावेश होता.

प्रत्येक भजनी मंडळ व कलापथकात किमान 10 कलाकारांचा समावेश होता. भारुडासारखे इतरही काही वैयक्तिक कलाप्रकार सादर करण्यात आले. ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी हा कलामहोत्सव घेण्यात आला. संयोजकांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक न काढता प्रत्येक सहभागी संघास सन्मानपत्रे देवून गौरविले. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष निंबा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष निंबा चौधरी, ताराचंद गवळे, काशिनाथ गवळे, पंडित बोढरे, दादाजी पाटील, रवींद्र पाटील, मणीलाल सोनवणे, भाईदास आप्पा, सुधाकर महाराज आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर भास्कर चिंचोले, नत्थु साळुंके, खंडू वानखेडे, अशोक पाटील, भिवा कारंडे, हिलाल शेवाळे, पांडुरंग गवळे, राजू पवार, राजेंद्र सूर्यवंशी, जगन मोरे, गुलाब गवळे, अशोक निकुंभ, बापू सोनवणे, उत्तम बागुल, आसाराम अहिरे, नाना रौन्दळ, वसंत अहिरे व म्हसाई माता ट्रस्ट आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास तालुक्यासह जिल्ह्यातील शेकडो शाहीर, कलावंत व वारकरी बांधव उपस्थित होते.

Web Title: khandesh shahir kalawant warkari mandal kala mahotsav at nijampur jaitane