Dhule : डोळ्यात घुसलेला चाकू काढला!; कोठलाच्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

Dr. who successfully removed the knife stuck in the patient's eye by surgery. Mukarram Khan and Co.
Dr. who successfully removed the knife stuck in the patient's eye by surgery. Mukarram Khan and Co.esakal

धुळे : कोठला (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथील एका व्यक्तीच्या डोळ्यात साडेतीन इंचापर्यंत खोल घुसलेला चाकू शहरातील साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करून बाहेर काढला व संबंधित व्यक्तीला जीवदान दिले. (knife stuck in eye Removed Successful surgery on Kothala patient in district hospital dhule Latest Marathi News)

Dr. who successfully removed the knife stuck in the patient's eye by surgery. Mukarram Khan and Co.
दहिपूल परिसराची समस्या कायम; सरस्वती नाल्यावर गेट बसविण्याच्या काम अपुर्ण

तळोदा येथील विलन सोमा भिलावे (वय-४०) यांच्या डोळ्यात साडेतीन इंच खोल पट्टी घुसलेली होती. नंदुरबार येथील रुग्णालयाने त्यांना धुळ्यात पाठविले. सोमवारी (ता.८) मध्यरात्री दीडनंतर श्री. भिलावे धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. मंगळवारी (ता.९) सकाळी साडेसातला अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे यांनी डॉ. मुकर्रम खान यांना फोन करून रुग्णाची माहिती दिली.

त्यानंतर डॉ. खान, डॉ. दीपाली गवळी, विजयश्री तोटे, डॉ. रोशनी घुगे व सर्जरी, मेडिसिन विभागाचे इतर डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी ऑपरेशन थिएटरमध्ये पोचले. रुग्णाच्या डोळ्यात पट्टी घुसली असावी असा डॉक्टरांना प्रथमदर्शनी समज झाला.

सहा ते साडेसहा इंचपैकी सुमारे साडेतीन इंच पट्टी डोळ्यात घुसलेली असल्याने श्री. भिलावे यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता होती. ब्रेन हॅमरेज होण्याची भीती होती. तसेच नाक, कान, घशालादेखील इजा होण्याची शक्यता होती. अशाही परिस्थितीत यशस्वी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर बाहेर काढलेली पट्टी चाकू असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, अवघड शस्त्रक्रियेनंतरही श्री. भिलावे यांनी दृष्टी मिळण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.

Dr. who successfully removed the knife stuck in the patient's eye by surgery. Mukarram Khan and Co.
'हर घर तिरंगा,...'; तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांची गाण्यातून जनजागृती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com