चिचोंडी खुर्द - (ता. येवला) येथील कोमल शंकर मढवई हिने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर एमपीएससी परीक्षा देत दुसऱ्या प्रयत्नात मंत्रालयात महसूल सहाय्यकपदावर बाजी मारली आहे. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने हे देदीप्यमान यश मिळविले आहे. .चिचोंडी खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील कोमलच्या या यशाने तिचे परिसरात कौतुक होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील कोमलने जिद्दीच्या बळावर मिळविलेले यश इतरांसाठी आदर्शवत ठरत आहे. .कोमलने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण येवला येथील स्वामी मुक्तानंद कॉलेजमधून पूर्ण केले. दरम्यान, बारावीत असताना वडिलांचे छत्र हरपले. आई एका पायाने अपंग असून, गावातच आशासेविका म्हणून काम करते. .कोमलने आईला शेतीकामात मदत करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. भाऊ ऋषिकेश पैठणी कारागीर आहे. भावालाही पैठणी कामात मदत करते. आईने वेळप्रसंगी दागिने गहाण ठेवत मुलीचे शिक्षण पूर्ण केले. जिद्द, मेहनत आणि नशिबाने दिलेली साथ सत्यात उतरत कोमलने मंत्रालयात थेट महसूल सहाय्यकपदावर स्वारी केली आहे. तिच्या या यशाचे गावात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत स्वागत करण्यात आले. तिचे या यशाबद्दल राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, मुख्याध्यापक आर. डी. पाटील, शरद शेजवळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक यांनी अभिनंदन केले. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.