मेहुणबारे (ता. चाळीसगाव)- वरखेडे (ता. चाळीसगाव) गावापासून चार किलोमीटरवर असलेल्या कृष्णापुरी प्रकल्पाच्या पाटचारीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. हे धरण झाल्यापासून आजपर्यंत या पाटचारीची साधी दुरुस्तीही झालेली नाही. त्यामुळे ही पाटचारी जणू काही ‘शो पीस’ ठरली आहे. या पाटचारीच्या दुरुस्तीचे काम तत्काळ करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.