जळगााव: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पडद्याआड नाट्यमय घडामोडीनंतर सभापतिपद आपल्याकडे खेचून आणण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला यश आले आहे. या निवडणुकीत महायुतीला जोरदार धक्का देत उद्धव ठाकरे गटाचे सुनील महाजन सभापतिपदी विजयी झाले. त्यांनी लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांचा पराभव केला, तर उपसभापतिपदी महायुतीचे एकमेव गोकुळ चव्हाण यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. येथील बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवारी (ता. २९) सकाळी अकराला सभापतिपदाची निवड प्रक्रिया पार पडली.