लासलगाव- नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे वीज वितरण कंपनीच्या वतीने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौरकृषी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शासनाचा कोळशावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, स्वस्त आणि पर्यावरणपूरक वीजनिर्मितीला चालना मिळणार आहे.