Nandurbar Crime News : अवैध स्पिरिट वाहतुकीवर एलसीबीची कारवाई

Police officers and police personnel of the action team along with the material at Mhasavad police station.
Police officers and police personnel of the action team along with the material at Mhasavad police station.esakal

Nandurbar Crime News : दारू बनविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या अवैध स्पिरिट वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. त्यात ५८५ लिटर स्पिरिटसह दहा लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.(LCB Action on Illegal Spirit Traffic nandurbar crime news)

म्हसावद (ता. शहादा)मार्गे धडगाव येथे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून अवैध दारू बनविण्यासाठी उपयोगी पडणारे व मानवी शरीरास अपायकारक असलल्या स्पिरिटची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळविले.

गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद पोलिस ठाणे हद्दीतील दरा गावाच्या पुढे उनपदेव फाट्याजवळ सापळा रचला. म्हसावद गावाकडून येणाऱ्या वाहनांची पथक तपासणी करीत असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाचे वाहन भरधाव आले. पथकाने इशारा दिला असता चालकाने वाहन भरधाव पुढे नेले. पथकाला संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला. वाहन उनपदेव डॅमजवळ सोडून चालकाने तेथून पळ काढला.

Police officers and police personnel of the action team along with the material at Mhasavad police station.
Nandurbar Crime News : खोटा गुन्हा दाखल प्रकरणी पोलिसांना 21 हजारांचा दंड

वाहनाची तपासणी केली असता त्यात दोन लाख चार हजार ७५० रुपये किमतीच्या नऊ प्लॅस्टिकच्या गोण्या, त्यात प्रत्येकी १३ असे एकूण ११७ पाउच त्यात एकूण ५८५ लिटर दारू बनविण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरिट, आठ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाचे बोलेरो वाहन (एमएच १२, ईजी ४७७३) असा दहा लाख चार हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

तो जप्त करण्यात आला. पळून गेलेल्या संशयित आरोपींविरुद्ध म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील फरारी आरोपींना लवकरच शोधून बेड्या ठोकण्यात येतील व त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Police officers and police personnel of the action team along with the material at Mhasavad police station.
Nandurbar Crime News : नवापूर पोलिसांनी कारसह पकडला अवैध मद्यसाठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com