पारोळा- उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने भाजीपाला बाजारात लिंबूचे दर वाढताना दिसून येत आहेत. त्यामुळे लिंबूविना सरबत व त्याचा गोडवा हा काहीसा कमी होताना दिसत आहे. सद्यःस्थितीत बाजारात दहा रुपयाला दोन अशी किरकोळ विक्री दुकानदार लिंबूची करीत आहेत. कांदा शंभर रुपयाला चार किलो असा विकला जात आहे.