धुळे : सुकवद शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

जितेंद्र मेखे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

सुकवद शेत शिवारात नदीच्या काठी मोठ्या प्रमाणावर बाभळाचि झाडे   आहेत यामुळे सदर ठिकाणी या प्राण्यांना लपण्यास मोठी जागा आहे. त्यामुळे सदर प्राण्यांच्या शोध घेणे कठीण आहे तरी सदर बाभूळ तोड्नेसाठी शासन स्तरावरून कार्यवाही व्हावी यासाठी एप्रिल रोजी शिरपुर उपविभागीय अधिकारी नितिन गावंडे यांना निवेदन देणार.
- शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके

शिंदखेडा (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील सुकवद गावात १ एप्रिल रोजी बिबट्याबे (वाघाने) अण्णा पाटील या शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने मोटार सायकलीच्या वेगाने बिबट्यास हल्ला करता आला नाही. त्यातून शेतकऱ्याची सुदैवाने सुटका झाली. 

या बाबतीत वन विभागाला कळवून देखील अद्याप पावेतो कुठलीही कार्यवाही न केल्याने आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके ,तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, छोटू पाटील, सर्जेराव पाटील, शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, सागर देसले, सुकवद विकास सोसायटीचे चेअरमन विश्वासराव पाटील आदींनी आज शिंदखेडा क्षत्रिय वनपाल कार्यालयात जाऊन निवेदन देण्यासाठी दुपारी २.३० ते ३.०० च्या सुमारास गेले असता कार्यालयात लिपिक व शिपाई व वनरक्षक जयश्री पाटील उपस्थिती होते.

याशिवाय आज आठवड्याचा पहिला दिवस असतांना मुख्यालयाला अधिकारी हजर नसल्याने शिवसेनेचे पदाधिकारी संतापले व शिवसेना स्टाईलणे आंदोलनास सुरुवात केली वनपरिक्षेत्र क्षेत्र अधिकारी यांच्या दालनात हे आंदोलन करीत घोषणा दिल्यात. काही काळाने वनरक्षक व वनपाल आर ई पाटील यांनी कार्यालयात येऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आपणा सोबतच गावात येऊन सदर घटनेबाबतचा तपास करून संबंधित वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी उपाययोजना करू यावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत याबाबतचे निवेदन के .वाय .माने वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या खुर्चीला चिटकविले.

निवेदनात म्हटले आहे की परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने शेती कामासाठी मजूर येण्यास तयार नाही त्यामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत .तरी याबाबतीत कार्यवाही करून संबंधित वन्य प्राण्यास पकडून योग्य कार्यवाही करावी .

सदर घटनास्थळी शिवसेनेचे पदाधिकारी व वनखात्याचा अधिकारी  यांनी भेट दिली असता  सदरच्या ठिकाणी वावर असणाऱ्या वन्यप्राण्याच्या ठसे घेतले असता याठिकाणी नर व मादी आणि बछडे असावेत असा अंदाज वनक्षेत्र अधिकारी यांनी व्यक्त केला. दरम्यान सदर घटनेमुळे सुकवद व परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन सदर प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.  

सुकवद शेत शिवारात नदीच्या काठी मोठ्या प्रमाणावर बाभळाचि झाडे   आहेत यामुळे सदर ठिकाणी या प्राण्यांना लपण्यास मोठी जागा आहे. त्यामुळे सदर प्राण्यांच्या शोध घेणे कठीण आहे तरी सदर बाभूळ तोड्नेसाठी शासन स्तरावरून कार्यवाही व्हावी यासाठी एप्रिल रोजी शिरपुर उपविभागीय अधिकारी नितिन गावंडे यांना निवेदन देणार.
- शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके

सदर ठिकाणी वनपाल यांना थांबवून फटाके फोडणे ,धूर करून संबंधित वन्य प्राण्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत असुन जिल्हा वनक्षेत्र अधिकारी यांचेकडे सदर वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्याची मागणी करीत आहोत .ते उपलब्ध झाल्यानंतर सदर ठिकाणी पिंजरा लावण्यात येईल.
- परिक्षेत्र अधिकारी माने

Web Title: leopard attack farmer in Dhule district