ऊसतोड करतांना पिल्लांसह बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण 

फुंदीलाल माळी
Tuesday, 23 February 2021

ऊसतोड मजूर सकाळी शेतात पोहोचले असता त्यांना बिबट्याची दोन पिल्ले उसाचा पाचट मध्ये आढळून आली. त्याच वेळी शेतात मादी बिबट्या देखील दिसली.

तळोदा ः मोड येथील नवलसिंग राजपूत यांच्‍या ऊसाच्या शेतात उसतोडण्याचे काम सुरू होते. काम सुरू असतांना अचानक ऊसतोड कामगारांना शेतात दोन पिल्लासंह मादी बिबट्यांचे दर्शन झाले. मजुरांना पाहून मादी बिबट्या पसार झाली. मात्र बिबट्याचे पिल्लू हे शेतात राहिले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

आवश्य वाचा- वीज बिलांसाठी अडवणूक; शेतकरी, वीज अभियंत्यांमध्ये खडाजंगी 
 

मोड शिवारातील ऊसाच्या शेतांमध्ये उसतोडणीचे काम सुरू आहे.  ऊसतोड मजूर सकाळी शेतात पोहोचले असता त्यांना बिबट्याची दोन पिल्ले उसाचा पाचट मध्ये आढळून आली. त्याच वेळी शेतात मादी बिबट्या देखील दिसली. मजुरांना पाहून मादी बिबट्या तेथून पसार झाली. मात्र उसाचा शेतातच पिल्ले असल्याने मादी त्याच ठिकाणी गिरक्या घालेल अशी शक्यता वर्तविल्याने भीती पसरली होती. 
 

आवर्जून वाचा- खानदेशावासीयांची वाहिनी पुन्हा सुरू करण्याचे संकेत; सुरत- अमरावती पॅसेंजरही पुर्ववत 
 

वन विभागाचे अधिकारी पोहचले
वन विभागाच्या राणीपुर बिटचे वनपाल एन. पी. पाटील, वनरक्षक राजा पावरा, अमित पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन दिवस ऊस तोडणी थांबवण्याची सूचना केली. कोणीही शेतात एकट्याने जाऊ नये अशा सूचना वन विभागाने दिल्या आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard marathi news nandurbar taloda fear among leopard workers sugarcane fields