
पिल्लाला सुरक्षीत बाहेर काढल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंदाना येथे हलवीले. पिलांच्या शोधत मादा बिबट्या आक्रमक झाल्यास.
ब्राम्हणपुरी : नंदूरबार जिल्ह्यातील एका खेडेगावातील शेतातील कोरड्या विहिरीत बिबट्याचे पिलू पडले. मादी बिबट्याने हंबरडा फोडला पण शेतकऱ्याला विहिरीत काहितरी पडले असल्याचा अंदाज आला आणि बिबट्याचे पिल्लू वाचविण्याचे वन विभागाकडून रेस्क्यू सुरू झाले.
आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूक: उमेदवार मिळू नये यासाठी रचले जातायं डावपेच, ते कोणते ? वाचा सविस्तर
नंदूरबार जिल्ह्यातील ब्राम्हणपुरी जवळील खेडदिगर येथील अनिमेश शाह यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात रविवारच्या रात्री कोरड्या विहिरीत बिबट्याचे पडले. मादी बिबट्या अन्य पिल्ला सोबत विहिरी भोवती फिरून पिल्लासाठी हंबरडा फोडून फिरत होती.
अन सुरू झाले रेस्क्यू...
खेडदिगर गाव मध्यप्रदेश सीमेवर असून या शेतात दोघी राज्याच्या वनविभागाचे पथक घटना माहिती पडल्यावर हजर झाले आणि पिल्लाला वाचविण्याचे रेस्क्यू सुरू झाला. दिड-दोन तासात बिबट्याच्या या पिल्लाला विहिरीतून सुरक्षीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढले. रेस्क्यू वेळी नंदुरबार डी एफ.ओ. एस. बि. केवटे, शहादा गस्ती पथकाचे रत्नपारखे मंदाना वनपाल एस. एस. देसले, आदी सह वनविभागाचे कर्मचारी उपस्तीत होते.
आवर्जून वाचा- शिक्षकांची नोकरी धोक्यात..काय आहे कारण वाचा
मंदाना येथे पिल्लाला हलवले
पिल्लाला सुरक्षीत बाहेर काढल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंदाना येथे हलवीले. पिलांच्या शोधत मादा बिबट्या आक्रमक झाल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा समाना काराव लागू शकतो या साठी वनविभागाने उचित ती दाखल घ्यावी अशी शेतकार्यावही अपेक्षा आहे या
संपादन- भूषण श्रीखंडे