जळगावात दारुचे वाहते पाट ;दिडलांखांच्या देशी विदेशी दारुसह तिघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020


जळगाव शहरात आणि जिल्ह्यात दारुचे पाट वाहिल्याची परिस्थीती आहे. दोन दिवसांपुर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी वाईन शॉप बंदचे आदेश दिले असतांना दारु तस्करांना संधीच सापडली . एमआयडीसी पोलिसांनी 63 हजारांची देशी तर गुन्हेशाखेने 57 हजारांची विदेशी दारु जप्त करुन दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

जळगाव,:- लॉकडाऊन काळात जळगाव शहरात आणि जिल्ह्यात दारुचे पाट वाहिल्याची परिस्थीती आहे. दोन दिवसांपुर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी वाईन शॉप बंदचे आदेश दिले असतांना दारु तस्करांना संधीच सापडली असून एमआयडीसी पोलिसांनी 63 हजारांची देशी तर गुन्हेशाखेने 57 हजारांची विदेशी दारु जप्त करुन दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक बापु रोहम यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांच्या पथकातील संजय हिवरकर, राजेश मेंढे, किरण धनगर अशांच्या पथकाने देविदास नगर परिसरातील संदिप मधुकर चौधरी हा संजय चौधरी यांच्या घरात भाड्याने राहत असून दारु विक्री करीत असल्याची बातमी वरुन छापा टाकला असता संदिप मधुकर चौधरी याच्या घरात बेडरुम मध्ये 120 बियर टिन, 120 बियरच्या मोठ्या बॉटल्स्‌ आणि व्हिस्कीच्या 96 क्वार्टर मिळून आल्या. पोलिस पथकाने मिळालेल्या मालाचा पंचनामा करुन शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहेत. 

एमआयडीसीने पकडली देशी 
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील वरीष्ठ निरीक्षक विनायक लहारे यांच्या पथकातील अतुल वंजारी, आनंदसींग पाटिल, महेंद्रसींग पाटिल, अशोक सनगत, बळीराम सपकाळे, सचिन पाटिल अशांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यावरुन त्यांनी इच्छादेवी चौकात सापळा रचला होता. प्रकाश मितसींग बावरी(वय-31 तांबापुरा), विकास अशोक शिंदे(वय-28) असे दोघे दुचाकी (एमएच.19.डी.एच.8914) या वाहनाने जात असतांना त्यांना थांबवुन चौकशी केली असतां त्यांच्या ताब्यात 35 लिटरच्या कॅन मध्ये गावठी दारु आणि देशी दारुच्या बाटल्या असा तिन हजारांचा ऐवज मिळून आला. दुचाकीसह 63 हजारांचा ऐवज ताब्यात घेत दोघांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liquor flowing in Jalgaon ; Three arrested with domestic and foreign liquor