अठरा वर्षांपासून "मस्क्‍युलर डिस्ट्रॉफी'शी एकाकी झुंज 

अठरा वर्षांपासून "मस्क्‍युलर डिस्ट्रॉफी'शी एकाकी झुंज 

नाशिक -  आजकाल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तरुणांना नैराश्‍य येते. अगदी मोबाईलवर गेम खेळण्यास मज्जाव केला, तर टोकाचे पाऊल उचलले गेल्याची उदाहरणे आहेत. मात्र, अठरा वर्षांपासून येथील पंकज बूब "मस्क्‍युलर डिस्ट्रॉफी' या असाध्य आजाराने ग्रस्त असून, जगभरात यावर कुठे उपचार नसतानाही मोठ्या हिमतीने त्याच्याशी लढा देत आहे. एवढ्या आजाराशी लढतानाही स्वाभिमान जागृत ठेवत सहानुभूतीची अपेक्षा न ठेवता फक्त आजाराविषयी जनजागृती झाली पाहिजे, अशीच अपेक्षा पंकज व्यक्त करतो. 

येथील पंकज बूब 38 वर्षांचे आहेत. त्यांनी औषधनिर्माणशास्त्राची पदवी घेतली आहे. वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत सर्वसामान्यांसारखे जीवन अगदी आनंदात सुरू असतानाच 2001 ला मस्क्‍युलर डिस्ट्रॉफी आजाराने पंकजला घेरले. सुरवातीची दोन वर्षे आजार नेमका काय आहे, याचे निदानच झाले नाही. चालताना पाय फेकले जायचे. त्यामुळे चालायला अडचण होत होती. पुढे 2003 मध्ये पुण्याला गेल्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी या आजाराचे निदान केले. त्यानंतर मुंबईला काही दिवस उपचार केले. मात्र, विशेष काही पदरात पडले नाही. त्यानंतर होमिओपॅथी, आयुर्वेदिक, ऍलोपॅथी अशी सर्व प्रकारची उपचारपद्धती वापरली, पण काहीही फरक पडला नाही. फिजिओथेरपीने आहे त्या स्थितीत थोडेसे बरे वाटते. चालण्यास अडचणी येत असताना पडल्यामुळे वॉकरवर काही दिवस चालत होते. त्यानंतर चालणे बंद होऊन व्हीलचेअरवर काम सुरू होते. तीन वर्षांपासून आता हातही काम करत नसल्याने पूर्णतः एका जागेवरच आहेत. आता घरात एका जागेवर बसूनच आजाराशी दोन हात करणे सुरू आहे. घरात फक्त वृद्ध आई-वडील असल्याने कुणाचा सहाराही नाही. अशाही परिस्थितीत पंकज परिस्थितीला सामोरे जात आहेत. या आजाराविषयी जनजागृती होण्याची अपेक्षा पंकजने व्यक्त केली. 

हा आजार विशेषतः मुलांमध्येच होतो. लाखांमधून एखाद्या व्यक्तीला यासारख्या आजाराची लागण होते. आजारात पेशींचे काम करणे हळूहळू कमी होते. त्यामुळे आपले अवयवही काम करीत नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com