सटाण्यात जागतिक योग दिनानिमित्त दीर्घ आरोग्याचा संकल्प

रोशन खैरनार
शुक्रवार, 22 जून 2018

सटाणा - शहर व तालुक्यात काल गुरुवार (ता.२१) रोजी जागतिक योग दिन विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संघटना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून उत्साहत साजरा करण्यात आला. तालुक्यातील ४६१ शाळांमधील ७५ हजार विद्यार्थ्यांनी आज योगासने करून दीर्घ आरोग्याचा संकल्प केला.

सटाणा - शहर व तालुक्यात काल गुरुवार (ता.२१) रोजी जागतिक योग दिन विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संघटना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून उत्साहत साजरा करण्यात आला. तालुक्यातील ४६१ शाळांमधील ७५ हजार विद्यार्थ्यांनी आज योगासने करून दीर्घ आरोग्याचा संकल्प केला.

आज सकाळी येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या मैदानावर बागलाण तालुका पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान संघटना, बागलाण पंचायत समिती, शिक्षण विभाग, सटाणा नगरपरिषद, सटाणा पोलीस स्टेशन, नेहरू युवा केंद्र नाशिक व बागलाण शैक्षणिक सामाजिक कला, क्रिडा मंडळ सटाणा संचलित बागलाण अॅकेडमी, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग दिन कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष सुनील मोरे, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी पी.आर.जाधव, कैलास पगार, अॅकेडमीचे अध्यक्ष आनंदा महाले, महिला पतंजली तालुकाप्रमुख डॉ.विद्या सोनवणे, नंदकिशोर शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, वैद्यकिय अधिकारी डॉ. सैंद्रे, डॉ. शशिकांत कापडणीस, किशोर कदम, उषा भामरे, सिंधुताई सोनवणे, वैभव गांगुर्डे, मराठा हायस्कूलचे प्रभारी बी. ए. निकम, अभिनव बालविकास मंदिरचे मुख्याध्यापक के. के. तांदळे, मुख्याध्यापिका एस. आर. चंद्रात्रे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष श्री. मोरे म्हणाले, योग व प्राणायाम यातून जीवन जगण्याची कला अवगत होते. आपल्या पूर्वजांनी योगाच्या बळावर आत्मज्ञान प्राप्त केले तोच आपला प्राचीन योग संपूर्ण जगाने आपलासा केला. त्यामुळे भारताची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंच झाली आहे. 

डॉ.विद्या सोनवणे, नंदकिशोर शेवाळे, क्रीडाशिक्षक विनायक बच्छाव, सुनिता ईसई, सी. डी. सोनवणे, यशवंत भदाणे आदींनी योगासनांची प्रात्यक्षिके करून मार्गदर्शन केले. भव्य मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमास लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूल, अभिनव बालविकास मंदिर, आदर्श इंग्लिश मिडीअम स्कूल या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका नागरिक व शासकीय अधिकाऱ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके केली. यावेळी रामकृष्ण अहिरे, एस. टी. भामरे, आर. डी. खैरनार, एस. एम. पाटील, अरुण पाटील, सुरेखा तरटे, सचिन सोनवणे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

येथील प्रगती शिक्षण संस्था संचलित प्रगती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन योगासनांची विविध प्रात्याक्षिके करून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण येवला होते. श्री. येवला व शालेय समितीचे उपाध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्याक्रमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीमती एस. जे. गांगुर्डे, व्ही. झेड. भामरे व ओम पवार यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून मार्गदर्शन केले. शाळेच्या मैदानावर शेकडो विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून आरोग्याचा संकल्प केला. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे यांनी केले. मुख्याध्यापक अतुल अमृतकर यांनी योग दिनाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. ए. पी. केदारे यांनी सूत्रसंचालन केले. 

ताहाराबाद (ता.बागलाण) येथील मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, सटाणा संचलित आयएसओ मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच अंजली इंटरनॅशनल पब्लिक स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन योगासनांची विविध प्रात्याक्षिके करून उत्साहात साजरा करण्यात आला. 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दौलतराव गांगुर्डे यांच्या हस्ते योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापक हर्षल पाटील यांनी योगदिनाचे महत्व स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, अर्ध उट्रासन, शशकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मकरासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, अनुलोम - विलोम, भ्रामरी रेचक आदी योगासन प्रकारांचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन घेतले. कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव, अंजली इंटरनॅशनल पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती रत्ना शिंदे, सुनील निकुंभ, चेतन दाणी, जाधव राहुल, जयश्री वनीस, संगीता वाणी, सरला पवार, तीर्थराज खैरनार, सारिका अहिरे, चंद्रशेखर महाजन, रणवीर जिरे, मनीषा सोनवने, अजय पवार, मनोहर खैरनार, तुळशीदास चव्हाण आदी उपस्थित होते. एस.बी. गर्दे यांनी सूत्रसंचालन केले. अरुणा ठाकरे यांनी आभार मानले. 

दरम्यान, संस्थेच्या मुंजवाड (ता.बागलाण) येथील ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दौलतराव गांगुर्डे, मुख्याध्यापक विकास मानकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची योगासने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Long-Term Resolutions on international Yoga Day