लॉकडाऊन पंगतीत जेवणानंतर ;  पोलिसांच्या खाकी पाहुणचाराचा भोग !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

लॉक डाऊन आदेशाचे उल्लंघन करुन पार्टी करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात आल्यावर पोलिसांच्या पाहुण चाराने पाचावर धारण बसली होती.

जळगाव :- एमआयडीसी भागातील सेक्‍टर-72 मधील लिप केअर या कंपनीच्या गच्चीवर जेवणावळीचे ओयाजन करण्यात आले होते. लॉकडाऊनचे आदेश झुगारून पंगतीत बसलेल्यांना पोलिसांनी अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. लॉक डाऊन आदेशाचे उल्लंघन करुन पार्टी करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात आल्यावर पोलिसांच्या पाहुण चाराने पाचावर धारण बसली होती. 

सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार एमआयडीसीतील एम सेक्‍टर-72च्या एका कंपनीच्या गच्चीवर पार्टि सुरु असल्याची खात्री करण्यासाठी उपनिरीक्षक अमोल मोरे, संदिप पाटिल, सहाय्यक निरीक्षक अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील यांच्यासह पोलिस पथक धडकले. एम सेक्‍टरच्या लिप केअर कंपनीच्या बाहेर अनेक दुचाकी उभ्या होत्या आत गेल्यावर कंपनीच्या गच्चीवर थेट पंगत बसलेली होती. जेवणावळीची पार्टी रंगात असतांनाच पोलिसांनी संशयीतांना पोलिस ठाण्याचे निवते देत, ताब्यात घेतले. 

यांना झाली अटक 
चेतन वासुदेव पाटिल(वय35), कैलास वना कोळी(वय27), सुरेश अर्जुन सोनवणे(वय22), जयेश समाधान कोळी(वय22),जयेश समाधान कोळी(वय22),भाईदास दौलत ठाकूर(वय27), अनील रामदास चव्हाण(वय29),सागर दिलीप बारी(वय21),रोहिदास दौलत ठाकुर(वय30),हेमंत अरुण ठाकुर(वय29),किसन अरुण ठाकुर(वय26),कैलास न्हावकर(वय49),केशव गणेश सोलोने(वय31),सागर किसन कुंभार(वय20), पंकज ठाकुर(वय40)अशा चौदा जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरुदध साथरोग नियंत्रण अधीनियम, संचारबंदी आदेशाचे उल्लघन केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lunch parti at jalgaon midc brake up to lockdown