महादेवाच्या यात्रोत्सवाला सोमवार पासून प्रारंभ

सचिन गायकवाड 
रविवार, 8 एप्रिल 2018

चैत्र कृष्णवमीच्या मुहूर्तावर दरवर्षाला नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री क्षेत्र पिनाकेश्वरच्या महादेवाच्या यात्रेला पारंपरिक पद्धतीने प्रारंभ होत असतो. त्याची सुरवात मंदिरासमोरील महादेवाच्या मंदिरासमोरील 51 फूट उंचीच्या काठीवरील ध्वजारोहणाने होते.

जातेगाव - खान्देश-मराठवाडासह जिल्ह्यातील शिवभक्तांच्या श्रद्धेचे अढळस्थान असलेल्या जातेगाव येथील मोठ्या महादेवाच्या यात्रोत्सवाला उद्या सोमवार पासून प्रारंभ होणार आहे. 

चैत्र कृष्णवमीच्या मुहूर्तावर दरवर्षाला नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री क्षेत्र पिनाकेश्वरच्या महादेवाच्या यात्रेला पारंपरिक पद्धतीने प्रारंभ होत असतो. त्याची सुरवात मंदिरासमोरील महादेवाच्या मंदिरासमोरील 51 फूट उंचीच्या काठीवरील ध्वजारोहणाने होते. या काठीला पितळेच्या नंदी आहे. त्याला जलाभिषेक करून भक्तिभावाने पूजन करण्यात येते. या दरम्यानच्या काळात भाविक महादेवाच्या पालखीला गंगापूर तालुक्यातील लासूर गावात असणाऱ्या दाक्षायिनी देवीच्या भेटीला नेतात. 

देवी महादेवाची अर्धांगिनी असल्याची श्रद्धा असून यात्रेसाठी मुळ लावण्यासाठी पालखी देवीच्या दारात नेली जाते अशी आख्यायिका आहे. मुळ लावून परतल्यावर भाविकांच्या या जत्थ्याचे ढोलताशाच्या गजरात गावात स्वागत होते. आबालवृद्धांसह सर्व वयोगटातल्या भाविकांचे दंडवती व्रत पाळले जाते. या व्रतात झोपण्यासाठी खाट-गोधडीचा वापर करण्यासोबत अंगावर शर्ट बनियानचा वापर टाळला जातो व अनवाणी राहिले जाते. दंडवते व्रतात गावातील हिंदू-मुस्लिम सर्वजण मांसाहार वर्ज्य करतात. हे दंडवतीचे व्रत करनारे भाविक पहील्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन, तीसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी चार कि. मी. अंतर पाई आनवनी पायाने जाऊन परत येत असतात व पाचव्या दिवशी डोंगरावरील पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिरात व्रताचे आंगावर परीधान केलेल्या फुलांच्या माळा देवास आर्पन करुन आपल्या व्रताची सांगता करतात. मंदिराभोवती वाध्याच्या तालावर मनसोक्त नाचुन आंनदोस्तव साजरा करतात व खऱ्या अर्थाने यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. 

यात्रेच्या पहिल्या दिवशी मंदिरासमोरील दीपमाळ प्रज्वलित करण्यात येते. पिंडीवर ठेवलेल्या महादेवाच्या मुखवट्याची मिरवणूक काढली जाते. मुखवट्याचा मान यादव परिवाराकडे आहे. शेजारच्या कन्नड, वेजापूर नांदगाव तालुक्यातील विविध गावातून आलेली भजनी मंडळी सहभागी झालेले असतात. 

दृष्टीक्षेपात श्री क्षेत्र पिनाकेश्वर मंदिर
औरंगाबाद, नाशिक, जळगाव या तीन जिल्हाच्या सीमेवर असलेल्या पितळ खोऱ्याच्या डोंगररांगेचा शेवट नांदगाव तालुक्यातील जातेगाव भागातील घाटमाथ्यावर होतो. अशा डोंगर रांगेत प्राचीन असे महादेवाचे मंदिर आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात निष्काम कर्मयोगी म्हणून स्थान मिळविणारे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या पुढाकाराने साठच्या दशकात हेमांड पद्धतीच्या मंदिराचा जिर्णोद्दार करण्यात आला. पुढे गंगागिरीजी महाराजांनी सभामंडप, भक्तनिवास भांडारगृह गोशाळा आदी कामे केलीत महादेवाच्या मंदिरापुढे शक्यतो दीपमाळ नसते. जातेगाच्या मंदिरापुढे ती आहे शिवमहिमा-शिवलीलामृत ग्रंथात जातेगावच्या श्री क्षेत्र पिनाकेश्वर मंदिराचा संदर्भ येतो. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Mahadev yatra starts from Monday