Dhule News : शिंदखेड्यात महाले, सोनवणे निलंबित; अंगणवाडीतील भरती भोवली

Suspension
Suspension esakal

Dhule News : शिंदखेडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाद्वारे झालेल्या भरतीत अनियमितता झाली आहे.

विनापरवानगी, परस्पर आणि नियम धाब्यावर बसवून, गुणांमध्ये हेराफेरी करत झालेल्या अनियमिततेमुळे जिल्हा परिषदेच्या संतप्त मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांनी प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि लिपिक महिलेला तडकाफडकी निलंबित केले. (Mahale Sonawane in Shindkheda suspended dhule news)

गैरउद्योगाद्वारे झालेल्या भरतीप्रक्रियेतील सर्व नियुक्ता, उमेदवारांना दिलेल्या नियुक्ती ‘ऑर्डर’ रोखण्यात आल्या आहेत. तसेच पुनर्भरती प्रक्रिया राबविण्यासाठी यथोचित प्रस्ताव एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने सीईओ बुनवेश्‍वरी एस. यांच्याकडे सादर केला आहे.

शिंदखेडा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाद्वारे गैरप्रकारे भरती राबविण्यात आली. या कालावधीत बालविकास प्रकल्प अधिकारी रवींद्र शिवाजीराव मराठे निवृत्त झाले. त्यांच्या कालावधीत भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. मदतनीस, अंगणवाडीसेविका आदी विविध पदांची परस्पर भरतीप्रक्रिया राबविण्यात आल्याने ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Suspension
Dhule Agriculture News : शेतकऱ्यांचा खरीप मिरची लागवडीकडे कल

सीईओंचा निर्णय

मराठे निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी शिंदखेडा बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून पर्यवेक्षिका मालती महाले यांना प्रभारी पदभार देण्यात आला. असे असताना भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. उमेदवारांसाठीच्या शंभर गुणांमध्ये हेराफेरी करून अनियमितता करण्यात आली. त्यात चुकीच्या नेमणुका दिल्याचाही आरोप झाला.

त्यामुळे सीईओ बुवनेश्‍वरी एस. यांनी भरतीप्रक्रिया स्थगित करत, काही उमेदवारांना दिलेला नियुक्तीचा आदेश रोखत प्रभारी ‘सीडीपीओ’ मालती महाले व महिला लिपिक सोनवणे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच निवृत्त ‘सीडीपीओ’ मराठे यांच्याबाबत विभागीय चौकशीचा प्रस्ताव आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.

Suspension
Dhule School Reopen : पुस्तकाच्या 4 भागांमुळे विद्यार्थ्यांचे दप्तर होईल वेटलेस; शिक्षकांकडून शाळेची स्वच्छता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com