जळगाव: दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात चोपडामार्गे चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर तेथून तमिळनाडू आणि पुढे श्रीलंका असा मार्गक्रमण करत निघालेल्या अमली पदार्थाची वाहतूक करणारी कार चाळीसगाव पोलिसांनी अडवित चालकासह जप्त केले होते. याप्रकरणी तपासात प्रगती होऊन जळगाव पोलिस दलाने तमिळनाडूतील म्होरक्या महालिंगम नटराजन (वय ६२, रापट्टी रोड, विंलुदामावडी, ता. किझवेलूर नागापट्टम, तमिळनाडू) यास अटक करण्यात यश मिळाल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी (ता. २) पत्रकार परिषदेत दिली.