धुळे जिल्हा : चुरशीच्या लढती; अनपेक्षित निकालाची शक्‍यता : Election Results 2019

धुळे जिल्हा : चुरशीच्या लढती; अनपेक्षित निकालाची शक्‍यता : Election Results 2019

धुळे : जिल्ह्यातील मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा व शिरपूर हे दोन मतदारसंघ वगळता उर्वरित तीन मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत आहे. यामध्ये धुळे शहर मतदार संघातून भाजपचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांनी आतापर्यंत साडेतीन हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर धुळे शहर मतदार संघात युतीचे उमेदवार हिलाल माळी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदार संघातून रावल यांनी 13 व्या फेरीअखेर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर सुमारे 24 हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. तर शिरपूरमधून भाजप उमेदवार काशिराम पावारा 17 हजार मतांनी आघाडीवर आहेत. धुळे शहरात भाजपचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांनी 6व्या फेरीअखेर सुमारे साडेतीन हजार मतांची आघाडी घेतली होती. त्याचे प्रतिस्पर्धी माजी आमदार अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे दुसऱ्या क्रमांकावर, तर शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच धुळे ग्रामीण मतदारसंघात देखील चुरशीची लढत होत असून कॉंग्रेस उमेदवार कुणाल पाटील हे भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांच्यापेक्षा अवघ्या साडेपाचशे मतांनी सहाव्या फेरीअखेर आघाडीवर होते. तर साक्री मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंजुळा गावीत यांनी नवव्या फेरीअखेर भाजप उमेदवार मोहन सूर्यवंशी यांच्यावर 7 हजार 200 मतांची आघाडी घेतली होती. यामुळे धुळे जिल्ह्यातील लढतींमध्ये चुरशीच्या लढती पाहण्यास मिळत असून, अनपेक्षित निकाल लागण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com