जामनेर मतदारसंघात सहाव्यांदा गिरीश महाजन विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

जामनेर : विधानसभेची सकाळी आठ वाजेपासुन सुरु झाली, त्यातील पहील्या फेरीपासुनच राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन हे सलग सहाव्यांदा विजयी "षटकार" मारून विधानसभेत पोहचले आहेत. गिरीष महाजन यांना एकुण १,१४ ७१४ तर काँग्रेसआघाडीचे संजय गरूड यांना ७९, ७०० मते पडली. अशा प्रकारे सुमारे ३५,o१४ मतांनी मंत्री महाजन विजयी घोषीत झाले. 

पहील्या फेरीत मंत्री महाजन यांनाआघाडी मिळाल्याचे समजताच मतदार संघातील पदाधीकारी, कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी मोठी गर्दी करायला सुरुवात केली होती. अंतीम निकालाचा अंदाज लक्षात येताच कार्यकर्त्यांकडुन फटाक्यांची जोरदार आतीषबाजी व ढोल-ताशांच्या गजराने शहर दणाणुन गेले होते. यासोबतच संपुर्ण मतदार संघामधे भाजपच्यावतीने विजयी जल्लोषाचे वातावरण रस्तो-रस्ती दिसत होते. मतमोजणीची प्रक्रीया सुरू होती, तर दुसरीकडे मंत्र्यांनी सिध्दगड भवानीदेवी दर्शनासाठी रवाना झाले. प्रत्येक विधानसभा निवडणुक प्रचाराची सुरूवातही याच ठिकाणी नारळ वाढवुन करीत असतात, आणि निकालाच्या दिवशीही ते सिध्दगड येथे जातात. आजही त्यांनी देवीचे दर्शन घेऊन शहरामधे पदार्पण केले. भाजप कार्यकर्त्यांद्वारा आयोजीत मिरवणुकीत सहभागी झाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results jamner girish mahajan