मुक्ताईनगर : खडसेंना मोठा धक्का; कन्या पराभूत : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

जळगाव : गेल्या तीस वर्षांपासून सलग सहावेळा निवडून येत अधिराज्य गाजविणाऱ्या एकनाथराव खडसेंना मुक्ताईनगर मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी यांचा निसटता पराभव झाला. शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा अवघ्या बाराशे मतांनी विजयी झाल्याचे वृत्त आहे. 

भाजपने यावेळी खडसेंना उमेदवारी नाकारुन त्यांच्या कन्या रोहिणी खडसे- खेवलकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांना माघार घ्यायला लावून चंद्रकांत पाटलांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे अत्यंत अटीतटीच्या व अखेरच्या फेरीपर्यंत चढ- उतार झालेल्या या लढतीत अखेर चंद्रकांत पाटलांनी सुमारे सातशे मतांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला. खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

मतांमध्ये चढउतार 
पहिल्या फेरीपासून मतांमध्ये चुरस सुरू होती. 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली असून, पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना आघाडी राहिली होती. परंतु त्यानंतर रोहिणी खडसे यांनी मताधिक्‍य घेत अठराव्या फेरीपर्यंत त्यांनी आपली आघाडी कायम राखली होती. परंतु यानंतर बोदवड परिसरातून चंद्रकांत पाटील यांना आघाडी मिळाली असून, शेवटच्या फेरीअखेर रोहिणी खडसे या अवघ्या बाराशे मतांनी पराभूत झाल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results muktainagar rahoni khadse down