esakal | राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आघाडीवर | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आघाडीवर | Election Results 2019

तिसऱ्या फेरीत भुजबळ यांना ४४६६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संभाजी पवार यांना ३०४१ मते मिळाली आहे.

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आघाडीवर | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येवला : राज्यभर बिग फाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला मतदारसंघात राष्ट्रवादी नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे चौथ्या फेरीअखेर १० हजार २५७ मतांनी आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीत भुजबळ यांना ४४६६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संभाजी पवार यांना ३०४१ मते मिळाली आहे.

या मतदार संघात सुरवातीपासून भुजबळ यांनी आघाडी घेतली असून, ही आघाडी वाढतच आहे. दावे- प्रतिदावे आणि घटलेले व वाढलेले मतदानानुसार नेते व उमेदवारांकडून अंदाज लावले जात होते. यावेळी तब्बल तीन टक्के मतदान घटले असल्याने याचा तोटा कुणाला, यावरही बरीच चर्चा झाली.

विशेषतः शहरातील घटलेले मुस्लिम समाजाचे मतदान अन्‌ मराठा समाजातील वाढलेले मतदान यावर बरीच गणिते अवलंबून आहेयेवला विधानसभा मतदारसंघ 
----------------------------------
फेरी क्रमांक : ०३ - एकूण मते
उमेदवार पक्ष मिळालेली मते 
----------------------------------
छगन भुजबळ : राष्ट्रवादी : १६१०६
संभाजी पवार  : शिवसेना : ८६६७

---------------------------------
आघाडी :  भुजबळ आघाडी - 
झालेले मतदान : २००५०६
मोजलेली मते : २५५५१

loading image
go to top