Vidhan Sabha 2019 : मुक्ताईनगर : बंडखोराचे आव्हान

दीपक चौधरी
Friday, 18 October 2019

मुक्‍ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या ॲड. रोहिणी आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केलेले उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. खडसेंनी सलग सहा वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यंदा त्यांच्याऐवजी त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे, राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी खेळी करीत आपले उमेदवार ॲड. रवींद्र पाटलांना माघारीचे आदेश दिले. परिणामी, ॲड. खडसे आणि पाटील यांच्यात लढत आहे.

विधानसभा 2019 : मुक्‍ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या ॲड. रोहिणी आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केलेले उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. खडसेंनी सलग सहा वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यंदा त्यांच्याऐवजी त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे, राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी खेळी करीत आपले उमेदवार ॲड. रवींद्र पाटलांना माघारीचे आदेश दिले. परिणामी, ॲड. खडसे आणि पाटील यांच्यात लढत आहे.

शिवाय, राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिल्याने चुरस आहे. येथे खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय. दुसरीकडे, पाटील यांनीही शड्डू ठोकत निवडणूक जातीय समीकरणांकडे नेण्याचा प्रयत्न चालवलाय.

ॲड. रोहिणी खडसे
बलस्थाने

    एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे.
    मतदारसंघात झालेली ‘जलयुक्त’ची विक्रमी कामे.
    कारखान्यांच्या माध्यमातून उपलब्ध रोजगार.

उणिवा
    विधानसभेच्या रिंगणात नवख्या उमेदवार.
    आमदार खडसेंवरच संपूर्ण मदार.
    खडसेंच्या घराणेशाहीचा अडथळा.
    भाजपमधील अंतर्गत गटबाजी.

चंद्रकांत पाटील
बलस्थाने

    मतदारसंघातून दोनदा पराभवामुळे मतदारांची सहानुभूती.
    अत्यंत कमी कालावधीत दांडगा जनसंपर्क निर्माण करण्यात यश.
    राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सामाजिक गणित जुळले.

उणिवा
    कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी नाही.
    शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा.
    केवळ मराठा मतांच्या गणितावर अवलंबून.
    प्रचारास उशीरा सुरवात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 muktainagar rebel politics