Vidhan Sabha 2019 : ‘पीएम’ बंदोबस्ताचा ‘नाशिक पॅटर्न’

नरेश हळणोर
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पारंपरिक बंदोबस्त पद्धतीला फाटा देत पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले, ज्यामुळे सुलभता आलीच, शिवाय प्रत्येकाला त्याच्या कामाची, जबाबदारीची एक दिवस आधीच माहिती होती. त्यामुळे ‘नाशिक पॅटर्न’ बंदोबस्ताची चर्चा राज्यभर झाली आहे.
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक

विधानसभा 2019 :
नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून, राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत. या सभांसाठी ज्या जिल्ह्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत, त्या जिल्ह्यांच्या पोलिस प्रमुखांकडून ‘नाशिक पॅटर्न’ बंदोबस्ताच्या नियोजनाची मागणी होत आहे.  

गेल्या महिन्यात नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची महाजनादेश यात्रा आणि दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी सभा झाली होती. यासाठी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आणि तितक्‍याच सुनियोजितरीत्या पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. परिणामी, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आलेला असतानाही, तो तितक्‍याच नियोजनबद्धतेमुळे निर्विघ्न पार पडला होता. या बंदोबस्ताची दखल पोलिस महासंचालक व गृहविभागानेही घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra vidhansabha 2019 PM bandobast nashik pattern