जळगाव- येथील बसस्थानकात जळगाव-जामनेर बसमध्ये चढताना आजोबांची बंडी कापून चोरट्याने ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी (ता.२) दुपारी घडली. काशिनाथ गणपत डोंगरे (वय ७९) असे आजोबांचे नाव असून, ते नाशिक येथून जळगावात आले व जामनेरला जाण्यासाठी बसमध्ये बसताना ही घटना घडली.