जळगाव- दहावी बोर्डाचा पहिला पेपर मराठी होता. या पेपरला शहरासह जिल्ह्यात कॉप्यांचा अक्षरश: पाऊस पडला. विद्यार्थ्यांचे मित्र, पालक, शिक्षकही बाहेरून काप्या पुरविताना दिसून आले. सर्वच शाळांमध्ये पोलिस बंदोबस्तही होता. मात्र काही ठिकाणी बाहेर तर काही ठिकाणी आतून कॉप्या सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.