येवला, लासलगाव- बैलांच्या शर्यतीत रंगलेला आखाडा, क्षणाक्षणाला वाढलेली उत्कंठा अन् विजेतेपदासाठी प्रत्येकाने लावलेले कसब, असे चित्तथरारक दृश्य शौकिनांनी अनुभवले ते बैलगाडा स्पर्धेत. आंबेगाव (ता. येवला) येथील आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार क्रीडारसिकांना अनुभवायला मिळाला. स्पर्धेत एक लाख एक हजार व ढाल असे प्रथम पारितोषिक आरोही करणसाहेब राजेवाडी व राहुल झोडगे चाळीसगाव- जालना यांच्या ‘मल्हार व शिवा’ या बैलजोडीने पटकावले.