मंदाणेला चोरट्यांचा धुमाकूळ..एकाच रात्री सात घर फोडली 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

सात घरे फोडत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड मिळून सुमारे वीस लाखांचा ऐवज लुटून नेला. या घटनेमुळे मंदाणे गावातील नागरीक भयभीत झाली आहे. 

मंदाणे (ता. शहादे,जि. नंदुरबार) ः येथे एकाच रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल सात घरे फोडत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड मिळून सुमारे वीस लाखांचा ऐवज लुटून नेला. या घटनेमुळे मंदाणे गावातील नागरीक भयभीत झाली आहे. 

मंदाणे गावात 1982 साली अशीच घरफोडीचे सत्र झाले होते. त्यानुसार रविवारी रात्री एकदा एकाच रात्री सात घरे फोडण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. संघटीत टोळीचा आणि पाळत ठेवून केलेला हा प्रकार 
असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलिसांनी घटनेनंतर गावात येत चौकशी केली, मात्र माहिती देणाऱ्या नागरिकांना अक्षरक्षः ढकलत घटनेचे गांभिर्य कमी करण्यात आले. पोलिसांच्या या वागणुकीबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

शिक्षक असलेले शशिकातं रामराव बेहेरे हे पत्नीसह कामानिमित नाशिकला गेले होते. ते आज सकाळी परतल्यानंतर त्यांना ही घटना समजली असता त्यांना तर भोवळचे येणे बाकी होते. त्यांच्या घरातून सराधिक 
जास्त सतरा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे सांगण्यात येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mandane marathi news one nighte sevan hoom`s robary