Manmad-Indore Railway, Mhow-Gyaspur Khedi, EPC Tende
esakal
धुळे, : बहुप्रतीक्षित मनमाड-इंदूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला गती मिळाली आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर (महू) ते ग्यासपूरखेडी या ७२.६६ किलोमीटर मार्गासाठी चार हजार ९३० कोटी ९१ लाख रुपयांची ईपीसी ई-निविदा काढली आहे. त्यामुळे मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग प्रत्यक्ष उभारणीच्या दिशेने पुढे गेला आहे.