Dhule News: दोंडाईचा पोलिस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता; 50 टक्के पदे रिक्त अन् गुन्हेगारीत वाढ

शहरात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने तत्काळ दोंडाईचा पोलिस ठाण्यात रिक्त पदांवर अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Dondai police station building.
Dondai police station building.esakal

दोंडाईचा : येथील पोलिस ठाण्यातील मंजूर पदांपेक्षा निम्मे कर्मचारी पदे रिक्त असल्याने येथील उपलब्ध पोलिस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आलेला आहे.

यामुळे शहरात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने तत्काळ दोंडाईचा पोलिस ठाण्यात रिक्त पदांवर अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (Manpower Shortage in Dondai Police Station 50 percent vacancies and increase in crime Dhule News)

शहरातील भौगोलिक राजकीय, सामाजिक परिस्थिती लक्षात घेता पुरेशा प्रमाणात पोलिस कर्मचारी असले पाहिजे. शहरात रेल्वे स्टेशन, कृषी उत्पन्न बाजार समिती, गुरुवारी भरणारा आठवडे बाजार , सोने चांदीचे दुकान, कापड दुकान ,मिरची खरेदी-विक्री होते.

गुजरात, मध्य प्रदेश या लगतच्या राज्यात जाणारे प्रमुख महामार्ग आहेत. दरम्यान रेल्वे स्टेशन वरती शासकीय अन्न-धान्य वितरण, खताचा रॅक येथे लागतो.

परिसरातील ५० पेक्षा जास्त गावातील ग्रामस्थांचा दैनंदिन संपर्क येतो. ठिकठिकाणी शहर गजबजलेले असते. शाळा महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.

मात्र या शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी असलेल्या पोलिस दलात मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याने शहरात हळूहळू गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दोंडाईचा पोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकूण ९० पदे मंजूर आहे.

मात्र सद्यःस्थितीत पोलिस ठाण्यात केवळ ३० पोलिस कर्मचारी कार्यरत आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता ही अगदी कमी संख्या आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.

तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कामाचा ताण आहे. यातच कामांची अदलाबदल झाल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना याचा देखील वेगळा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे कामगिरीवरही परिणाम होत आहे.

Dondai police station building.
Nashik Winter Business: थंडीमुळे उबदार कपड्यांचा बाजार फुलला; गेल्यावर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढली मागणी

मंजूर पदे

पोलिस निरीक्षक १, सहायक पोलिस निरीक्षक २, पोलिस उपनिरीक्षक ५, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ३, पोलिस हेड कॉन्स्टेबल २०, पोलिस नाईक १५, पोलिस कॉन्स्टेबल ५२, अन्य ७ असे असे ९० पदे मंजूर आहे.

कार्यरत अधिकारी

पोलिस निरीक्षक १, सहायक पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक २, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक १, पोलिस हवालदार ७, पोलिस नाईक ६, पोलिस शिपाई २२ असे तीस अधिकारी, पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत.

"शहराचा विस्तार वाढत आहे. गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्यासाठी, आवश्यक पोलिस कर्मचारी द्यावेत अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे."

- श्रीराम पवार, पोलिस निरीक्षक, दोंडाईचा

Dondai police station building.
Dhule News: मुख्यमंत्री शिंदे यांचा सचिवांना आदेश; मनोज मोरे यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com