बंद शाळांमुळे बालमजुरांमध्ये वाढ..तर मालकास पाच वर्षे कैद

बंद शाळांमुळे बालमजुरांमध्ये वाढ..तर मालकास पाच वर्षे कैद
Child Labor Day
Child Labor DayChild Labor Day

धुळे : कोरोनाप्रश्‍नी लॉकडाउनमुळे (Coronavirus lockdown) शाळा बंद आणि त्यामुळे बालमजूर (Child worker) वाढले आहेत. असे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व घटक आणि प्रशासन एकत्र आले, तर बालमजुरी हद्दपार करता येईल. याप्रश्‍नी परस्पर समन्वयातून जनजागृती शक्य होईल. तसेच गॅरेज, चहा विक्रेते अशा स्वरूपाचे व्यावसायिक, विविध संघटनांच्या प्रबोधनातून या प्रश्‍नाची सोडवणूक शक्य असल्याचे बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने यांनी सांगितले. (dhule-corona-lockdown-and-school-closed-impact-child-worker-growth)

Child Labor Day
बिबट्याच्या मुक्तसंचाराने भिती; खरिपाच्या तयारीत अडचण

शहरात बालमजुरीविरोधी दिनानिमित्त चाईल्ड लाईन (१०९८) संस्था, शासकीय बालकल्याण समिती, बालसंरक्षण पोलिस पथक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प पथक, महिला व बालविकास विभागाचा बालसंरक्षण कक्षातर्फे बारापत्थर चौकातील मनपा उर्दू शाळेत कार्यक्रम झाला. अॅड. दुसाने अध्यक्षस्थानी होते. कामगार अधिकारी अवधूत रुईकर, समिती सदस्य प्रा. वैशाली पाटील, ॲड. मंगला चौधरी, मिना भोसले, मोनिका जोजाटे, यांच्यासह संबंधित कक्षाचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे होते.

तर पोलिसांकडून कारवाई

प्रा. पाटील म्हणाल्या, की बुटपॉलीश, गॅरेज, हॉटेल आदी ठिकठिकाणी बालमजुर दिसतात. काही विविध कारणांमुळे भिकेच्या मार्गाला लागतात. त्यावेळी आपणच असहाय बालकांना दुर्बल बनवतो. हतबल मुलांचे शोषण केले जाते. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी पालकांचीच असते. त्यांना मुलांचे भविष्य घडविले, तर सामाजिक बदल घडू शकतात याची जाणीव करून द्यावी लागेल. बालमजुरीला उद्युक्त करणारे मालक, पालकांविरोधात पोलिस यंत्रणा गुन्हा दाखल करू शकते. त्यात मालकास पाच वर्षे कैद व लाखाचा दंड होऊ शकतो. याविषयी जनजागृतीची गरज आहे. कामगार आधिकारी रईकर यांनी बालकामगार कायद्याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती जोजाटे यांचा समितीने सत्कार केला. बालसंरक्षण कक्षाचे जगदीश झिरे, मनोज मोरे, भारती मोहने, राहुल पाटील, भारती पटले, उमेश सोनार, यशवंत बैसाणे, प्रकाश जगताप, महादू सूर्यवंशी, बापू दुकळे, वाल्मिक देसले, मोहनीश भामरे, देविदास बडगुजर, जयश्री निकम, सपना देवरे, वाल्मीक देसले, नफिस अहमद अनीस, अजय ताकटे, रुपाली झाल्टे, सुकलाल गायकवाड, भाग्यश्री जैन, जगदीश जगताप, नितीन साबळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com