esakal | Video मानवतेला काळिमा फासणारी घटना..मयताच्या खिशातून काढली रोख रक्कम; प्रकार कॅमेरात कैद
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

Video मानवतेला काळिमा फासणारी घटना..मयताच्या खिशातून काढली रोख रक्कम; प्रकार कॅमेरात कैद

sakal_logo
By
राजेश सोनवणे

धुळे : कोरोना महामारीत सर्वत्र हाहाकार माजत असताना काहीजण मदतीसाठी सर्वस्व अर्पण करत आहेत. तर काही संधीच सोन म्हणून मिळेल ते घेण्यासाठी माणुसकीची लक्तरे वेशीवर टांगत आहे. असाच प्रकार धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील खाजगी रुग्णालयात पहावयास मिळाल्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज म्हणजेच "कोई हात धो रहा तो कोई हातोसे धो रहा" याची प्रचिती धुळेकर नागरिक अनुभवत प्रशासनाबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

रुग्णालयात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मयताच्या खिशातील रोकड व आभूषणे काढत असल्याचे रुग्णालयात असलेल्‍या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. ही महिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली असता त्यांनी घडलेला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केल्‍याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. यानंतर नातेवाईकांनी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली.

तर विश्‍वास कोणावर ठेवावा

घडलेल्या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असून देवरूपी मंदिरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची अशी फसवणूक होत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासन झालेल्या प्रकारावर कारवाई करता की जिल्हा प्रशासन अशा रुग्णालयावर कारवाई करत सर्वसामान्य नागरिकांना विश्वास देतो याची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

व्हिडीओ होतेाय व्हायरल

कोरोना पॉझिटीव्ह रूग्‍णांवर उपचार करण्यासाठी खासगी रूग्‍णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यास त्‍याच्यावर ठरवून दिलेल्‍या नियमानुसार अंत्‍यसंस्‍कार करण्यात येत असतात. परंतु, मृताचे नातेवाईक दुःखात बुडाले असताना रूग्‍णालयातील कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले उद्योग बाहेर दिसून येत नाही. मात्र धुळे शहरातील असाच प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि त्‍याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

loading image
go to top