धुळ्यात वादळी वाऱ्‍यासह मुसळधार पावसाची हजेरी

धुळ्यात वादळी वाऱ्‍यासह मुसळधार पावसाची हजेरी
rain
rainrain

धुळे : मेमध्ये शहरातील तापमान (tempreture) चाळिशीच्या पलिकडे गेलेले असताना पूर्वमोसमी पावसाने त्यावर पाणी फेरले. वादळी वाऱ्‍यासह मुसळधार पावसाने (Rain and storm) हजेरी लावली. जवळपास तासभर झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश भागात पाणी साचले. देवपुरातील प्रोफेसर कॉलनीत गोकुळ अपार्टमेंटसमोर वादळी वाऱ्‍यामुळे विजेचे खांब, तर मालेगाव रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. परिणामी, काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. (dhule news heavy rain and storm farmer loss)

rain
पहिल्या ट्रकवर कारवाई नाही; अन्‌ तांदूळने भरलेला दुसरा ट्रक पकडला

सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी अचानक आकाशात ढगांच्या गर्दीने अंधार दाटला. दुपारी पावणेपाचच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. ढगांच्या प्रचंड गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्यांनाही पावसाचा फटका बसला. त्यामुळे अनेकांना मिळेल त्या ठिकाणी आडोसा शोधावा लागला. शहरातील अनेक सकल भागांत तसेच रस्त्यावरही पाणी साचले. गल्ली क्रमांक चारमधील श्रीराम मेडिकलजवळील भररस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहने हाकताना चालकांना कसरत करावी लागली. बच्चेकंपनींनी बिगरमोसमी पावसाचा पुरेपूर आनंद लुटला.

rain
भावी पिढी करिअरबाबत ‘ऑफलाइन’च

हवामान विभागाने वर्तविलेल्या तौत्के चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता खरी ठरली. आठवडाभरापासून वातावरणात उकाडा निर्माण झाला. दोन दिवसांपासून त्यात कमालीची वाढ झाली. आता पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्यात आणखी वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे तापमानाचा पारा वर सरकत आहे.

कापडणे परिसराला तीनवेळा झोडपले

कापडणे : परिसरातील कापडणे, न्याहळोद, कौठळ, जापी, बिलाडी, धमाणे, धनूर, तामसवाडी, हेंकळवाडी, सरवड, देवभाने, सायने, नगाव, तिसगाव, ढंढाणे, वडेलला सलग दुसऱ्‍या दिवशी वादळी वाऱ्‍यासह मुसळधार पावसाने झोडपले.दिवसभरात तीनवेळा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काढणीला आलेला कांदा आणि उन्हाळी भुईमुगाचे पावसामुळे नुकसान झाले.

आज दुपारी दीड, अडीच आणि चारला वादळी वाऱ्‍यासह पाऊस झाला. वादळामुळे शेतकऱ्‍यांची मोठी धांदल उडाली. काढणीला आलेला कांदा आणि भुईमुगाचे मोठे नुकसान झाले. शेती शिवारातच असलेल्या चाऱ्याचे पावसामुळे नुकसान झाले. ठिकठिकाणी मोठी वृक्षे उन्मळून पडली आहेत. अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com