चोरीचे वाहन २४ तासांत जप्त

चोरीचे वाहन २४ तासांत जप्त
चोरीचे वाहन २४ तासांत जप्त

शिरपूर (धुळे) : लघुशंकेच्या बहाण्याने वाहन थांबवून चालकाला लाथ मारून अर्टिगा कार पळविल्याच्या गुन्ह्याचा २४ तासांत यशस्वी तपास करीत सांगवी पोलिस ठाणे आणि धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना चतुर्भुज केले. थाळनेर (ता. शिरपूर) येथून सुरू झालेल्या या गुन्ह्याचा मध्य प्रदेशातील इंदूर ते होऱ्यापाणी आणि तेथून पुन्हा थाळनेर असा फेरा झाला आणि मुंबई-आग्रा महामार्गावर त्याची इतिश्री झाली. (shirpur-police-vehical-robbery-case-solve-two-days)

तालुक्यातील सांगवी- बोराडी रस्त्यावर २२ जूनला मध्यरात्री तीनला हा थरार घडला होता. चालक आयुष ओमप्रकाश बलदेवा (वय ३५, रा. इंदूर, मध्य प्रदेश) याला संशयितांनी शिरपूर टोलनाक्यावरील टोल टॅक्स वाचविण्यासाठी महामार्गाऐवजी बोराडीमार्गे जाण्यास सांगितले. वाटेत होऱ्यापाणीजवळ त्याला लघुशंकेच्या बहाण्याने खाली उतरवून रस्त्याच्या काठावरील नाल्यात फेकले. तो वर येईपर्यंत अर्टिगा कार (एमपी ४१, सीए ७७९५)सह कारमध्ये ठेवलेले दोन मोबाईल, एटीएम कार्ड व रोकड घेऊन संशयित फरार झाले. बलदेवाने तेथील शेताच्या रखवालदाराला उठविले व सांगवी पोलिसांशी संपर्क साधला.

चोरीचे वाहन २४ तासांत जप्त
विवाह आटोपून घरी परतल्‍यावर कुटुंबाला बसला हादरा

आग्रह करून पाजले मद्य

इंदूरला वर्ल्डकप चौकात संशयितांनी भाडेतत्त्वावरील वाहनाची चौकशी केली होती. नाशिकला इंटरव्ह्यूसाठी जायचे कारण सांगून दोघांनी भाडे ठरविले. २२ जूनला रात्री नऊला दोन संशयितांना घेऊन बलदेवा निघाला. रस्त्यात संशयितांना दोन साथीदार येऊन मिळाले. त्यांनी इंदूरपुढे आग्रह करून बलदेवाला मद्य पाजले. पुन्हा बिजासन घाटात आल्यावर बलदेवाने त्यांच्यासोबत मद्य घेतले. मद्याच्या अमलाखाली असल्यामुळे त्याला घटनाक्रम सांगता येत नव्हता. तथापि, सांगवीचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार यांनी मध्यरात्रीपासून तपास सुरू केला. बोराडीमार्गे शिरपूरला संशयित पळाले असावेत, असा कयास बांधून त्यांनी वाघाडी परिसरात तपास केला. त्यात अर्टिगा कार तेथून गेली नसल्याचे निष्पन्न झाले.

दोघांना अटक

महामार्गावर शिरपूर व सोनगीर येथील दोन्ही टोलनाक्यांवरील रेकॉर्ड व सीसीटीव्ही फुटेज धुंडाळल्यावर वाहन पुढे गेले नसल्याची खात्री पटली. दरम्यान, पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे या प्रकाराची माहिती पाठविली होती. एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जाळे विणले. अर्टिगा कार विकण्यासाठी संशयित महामार्गावर येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. तेथील हॉटेल बाबूजीजवळ पोचल्यावर अर्टिगा कार चोरीची असल्याची खात्री पटली. पोलिस कारवाईसाठी पुढे सरकताच कारमधील चौघांनी पळ काढला. संशयितांपैकी अजय दिलीप कोळी (वय २२) व सुभाष रघुनाथ कोळी (३६, दोघे रा. थाळनेर) यांना अटक केली. संशयितांनी चोरीची कबुली दिली असून, पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सांगवीचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, एलसीबीचे उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार रफिक पठाण, गौतम सपकाळे, राहुल सानप, श्रीशैल जाधव, कैलास महाजन यांचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com