esakal | तो नाही गावचा..पण मदतीला धावले संपुर्ण गाव

बोलून बातमी शोधा

help porson

तो नाही गावचा..पण मदतीला धावले संपुर्ण गाव

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : एखाद्या गावाचा विकास तेथील सोयी सुविधा व ग्रामस्थांची प्रगती यावरचं अवलंबून असते असे नाही. तर तेथील रहिवासींची दिलदारवृत्ती यावरही अवलंबून असते. यादृष्टीने सोनगीरचा खराखुरा विकास झाला असे म्हणता येईल. आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असलेल्या गावातील एकाला कोरोना झाला. तो कोण, कुठल्या जाती- धर्माचा याचा विचार न करता ग्रामस्थांनी यथाशक्ती मदत करीत त्याचा जीव वाचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रवीण काशिनाथ शिरसाठ असे त्याचे नाव आहे.

प्रवीण शिरसाठ मुळचा सार्वे (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी. पोटाची खळगी भरण्यासाठी सोनगीरला आला. भाड्याने घर घेऊन वाहन चालकापासून ते छायाचित्रकार व एका स्थानिक वाहिनी, वृत्तपत्रात तसेच मिळेल ते काम करून पुढे घरीच एक छोटी किराणा दुकान सुरू करून स्वाभिमानाने पत्नी, एक मुलगा व एक मुलगी अशा चौकोनी कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. अचानक त्यांना कोरोनाने गाठले. त्यांनी जवाहर रुग्णालय गाठले. मग सुरू झाला एक संघर्ष जीवनाचा मृत्यूशी.

सर्व पैसे संपले आता करायचे काय?

ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. रेमडिसीवरसाठी फिरफिर, ऑक्सिजनची पातळी कधी वर तर कधी खाली. अतिदक्षता विभागातून जनरल वार्डमध्ये, दोन दिवसांनी जनरल वार्डातून पुन्हा अतिदक्षता विभागात. वीस दिवसात हजारो रुपये औषधांवर खर्च झाला. घरात, पतसंस्थेत असलेले सर्व पैसे संपले. आता काय करायचे, पुढील उपचार कसा करणार? पैसे कुठून आणणार? कुटुंब हादरले.

मग गावच धावले मदतीला

काय करावे सुचेना. अशावेळी गावाशिवाय कोणीच आपला नसतो. एल. बी. चौधरी, प्रमोद धनगर, आरिफखान पठाण, रोशन जैन, जितेंद्र बागुल, विशाल कासार, सतीष भावसार, किशोर पावनकर, अनिल कासार निखिल परदेशी यांनी निधी देत उपचाराला गती दिली. त्यानंतर गावातील अनेकांनी उस्फूर्त व यथाशक्ती मदत करीत श्री. शिरसाठ यांना धीर दिला. त्यात विठ्ठल रखुमाई पतसंस्था, आर. के. माळी, ज्ञानेश्वर पाटील (बाभळे) यांचा सिंहाचा वाटा आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, अविनाश महाजन, शरद पाचपुते, केदारेश्वर मोरे, विशाल मोरे, अनिल पाटील, अल्ताफ कुरेशी, धाकू बडगुजर, श्यामलाल मोरे, श्रीकृपा पतसंस्था, हाॅॅटेल स्वागत, हाॅटेल महाजन, पांडूरंग पाटील, धनश्री हाॅटेल, अब्दुल हमीद पेट्रोल पंप, कैलास धनगर, कैलास वाणी, पवन गुजराथी, रवींद्र बडगुजर, राजेंद्र जाधव, पराग देशमुख, रविराज माळी, सागर हाॅटेल, भटू धनगर, राजेंद्र महाजन, दिनेश देवरे, श्याम माळी, साहेबराव बिरारी, नितीन कोठावदे, मुकेश येवले, योगेश देशमुख, लक्ष्मीकांत कोठावदे, घनश्याम गुजर आदींचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर धुळ्यातील दैनिक आपला महाराष्ट्राचे संपादक हेमंत मदाने, महेश घुगे, सामाजिक कार्यकर्त्यां गीतांजली कोळी व बाभळेचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांचे मित्रांनीही मदत केली.

बिलात मिळवून दिली सुट

शुक्रवारी म्‍हणजे ३० एप्रिलला डिस्चार्ज मिळाला. चक्क एक लाख ३६ हजार रुपयांचे बील हाती पडले. गावाने मदत करूनही एवढा पैसा जमलेला नव्हता. अशावेळी एल. बी. चौधरी यांनी आमदार कुणाल पाटील तसेच जवाहर मेडिकलचे प्रमुख डॉ. ममता पाटील यांना परिस्थितीची कल्पना दिली. अखेरीस आमदार पाटील, डॉ. ममता पाटील यांच्या माणूसकीने काही बील उधार करीत प्रवीण शिरसाठ यांना सुखरूप घरी पोहचवले. श्री. शिरसाठ यांनी मदत करणाऱ्या ग्रामस्थांचे व जवाहर मेडिकलचे आभार मानले आहेत.

संपादन- राजेश सोनवणे