ग्रामीण विरुद्ध शहरी युवकांचा लसीकरणासाठी संघर्ष; ऑनलाइन नोंदणीमुळे लसीकरणापासून वंचित

ग्रामीण विरुद्ध शहरी युवकांचा लसीकरणासाठी संघर्ष; ऑनलाइन नोंदणीमुळे लसीकरणापासून वंचित
vaccin center
vaccin centervaccin center

देऊर (धुळे) : धुळे तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी (vaccination) ऑनलाइन नोंदणीत धुळे ग्रामीण मधील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी वंचित राहत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. इतर तालुके व शहरासह जिल्ह्यातील नागरीक नोंदणी करून ग्रामीण भागात लसीकरण करून घेत आहेत. याउलट स्थानिक पातळीवरचे युवक, नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहे. या संघर्षमय वातावरणात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये वादविवाद होत आहे. याचा परिणाम वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यासोबत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गावातील व परिसरातील १८ ते ४४ वयोगटातील युवक, महिला ग्रामीण भागातीलच नागरिकांना त्याचा लाभ देण्यात यावा अशी मागणी धुळे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी संजय यादव यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले. (vaccin center vaccination not)

निवेदनात म्‍हटले आहे की, १८ ते ४४ वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लस नोंदणी ऑनलाइन सुरू झाली आहे. ऑनलाइन नोंदणीमुळे कोणीही कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही लस केंद्रावर नोंदणी करून लस घेत आहे. याचे प्रमाण धुळे तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहे. परिणामी त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण होत आहे. कुटुंबासह प्राथमिक आरोग्य केंद्रावर थेट नाशिक, जळगाव, भुसावळ, मालेगाव, अमळनेर आदी भागातील नागरिक लसीकरणासाठी थेट खासगी वाहनाने येत आहे. मात्र स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहे. लसीकरणासाठी वेबसाइटचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील बोटावर मोजता येणारे लसीकरण केंद्र ऑनलाइन प्रणालीत दिसत आहे. स्थानिक पातळीवरचे नागरिकांना आपल्याच गावातील आरोग्य केंद्रापासून दूर राहावे लागत आहे.

नोंदणी न झाल्‍याने लसी परत

अहिराणीत एक म्हण आहे. 'घर ना पोरे उघडा दुसराले कपडा' अशी स्थिती अनुभवास येत आहे. बहुतांश उपकेंद्रावरून ऑनलाइन नोंदणी न झाल्याने लसी परत आल्या. वरिष्ठ स्तरावरून या समस्या निकाली काढून आरोग्य केंद्रांवरचे कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करावा. भविष्यात याचा उद्रेकही होऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर फक्त ग्रामीण भागातीलच नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी. अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते तथा बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पंचायत समितीचे गटनेते पंढरीनाथ पाटील, रितेश पाटील, विशाल सैंदाणे, अशोक सुडके, बापू खैरनार, रावसाहेब पाटील आदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com