लांडगा आला अन्‌ अकरा बोकडांचा पाडला फडशा

लांडगा आला अन्‌ अकरा बोकडांचा पाडला फडशा
wolf killed goats
wolf killed goats

चिमठाणे (धुळे) : लंघाणे (ता. शिंदखेडा) येथील गावशिवरात पहाटेच्या सुमारास शेतात राहणारे शानाभाऊ श्रावण भिल (रा. लंघाणे) यांच्या मालकीच्या ११ बोकडांवर पहाटेच्या सुमारास लांडग्याने हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली. दरम्यान, एकाच मालकाचे ११ बोकड मारल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. संबंधित प्रशासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (dhule-news-wolf-came-and-killed-the-eleven-goats)

wolf killed goats
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्‍ला; चाकूने भोसकून मारण्याचा प्रयत्न

लंघाणे येथील शानाभाऊ श्रावण भिल यांनी शेतात बोकड चारून सायंकाळी गोठ्यात बांधले. दरम्यान, तिथे पाळत ठेवत असलेले त्यांचे वडील पहाट झाल्याने घरी निघून गेल्यावर संधीचे सोने करत लांडगा या गोठ्यात शिरला व शेळ्यांवर हल्ला चढविला. सकाळ झाल्यावर बोकडांच्या गोठ्यात आले असता त्यांच्या निदर्शनास आले, की लांडग्यांनी लहान-मोठे असे ११ बोकड फस्त केले होते. घटना बघून आरडाओरडा झाल्याने वन्यप्राणी शेजारच्या शेतात पळून गेला. घटनेची माहिती मिळताच तलाठी मनोहर पाटील यांनी लागलीच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वरकाटे, वनपाल रवींद्र वाघ, विखरणचे वनरक्षक बिपीन महाजन, वनमजूर मुनाप शाह यांना कळविले. दोघांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

शेळीपालनावर उदरनिर्वाह

कोरोनाच्या संकटकालीन सावटात भिल कुटुंबीयांचा उदरनिर्वाह शेळीपालनावर होत होता. मात्र लांडग्यांच्या हल्ल्यात त्यांच्या कमाईच्या साधनावावर लांडग्यांनी हल्ला चढविल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सकाळी उठून मृत बोकड पाहताच शानाभाऊ व त्यांच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्यांना धीर दिला. प्रशासनाने या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला असला तरी भरपाई मिळण्यासाठी विलंब न करता तातडीने प्रस्ताव सादर करून या गरीब कुटुंबीयांना लवकरात लवकर अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com