निवडणुकीवर भरारी पथके, व्हिडिओचा वॉच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule collector

निवडणुकीवर भरारी पथके, व्हिडिओचा वॉच

धुळे : येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी भरारी, बैठी, व्हिडिओ पथके आणि तपासणी नाक्यांवरही विशेष पथकांची नियुक्ती करण्याची सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी संयुक्त बैठकीत दिले. कोरोनासह आचारसंहितेचे नियम काटेकोर पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. (dhule-zilha-parishad-election-collector-meet-and-election-center-video-wacth)

निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यासह कोरोनासंबंधी लागू नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयीन निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे १५ गट व पंचायत समित्यांमधील रिक्त ३० गणांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलैला मतदान, तर २० जुलैला मतमोजणीसह निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, सुरेखा चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही!

मतदान केंद्र तपासावे

जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, अशी दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करीत निवडणूक पार पाडावी. मास्कचा वापर, शारीरिक अंतराचे पालन करण्यास मतदारांना प्रवृत्त करावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांची पाहणी करावी. तेथे वीज, पाणी, मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असतील, याची खात्री करावी. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्रांवर उपाययोजना कराव्या. अधिकाधिक मतदान केंद्र आदर्श होतील, याची खबरदारी बाळगावी. संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन पोलिस दलाने प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

तक्रार निवारण कक्ष

उमेदवारांसह मतदारांच्या सुविधेसाठी तक्रार निवारण कक्ष, मदत कक्ष, नियंत्रण कक्ष, हेल्पलाइन सुरू करावी. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळाचे आणि मतदान होणाऱ्या भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अभियानस्तरावर राबवावी. या निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे म्हणून यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी यादव यांनी दिली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आवश्यक तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येईल, असे अपर पोलिस अधीक्षक बच्छाव यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांनी पोटनिवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदींची नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Marathi Dhule News Zilha Parishad Election Collector Meet And Election Center Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top