
बलदाणे धरणातून पाटचारीसाठी सुमारे १४ कोटी रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे झालेल्या आढावा बैठक घेऊन शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी मंजूर केले.
शिंदखेड (नंदुरबार) : शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी प्रश्न सुटणार बलदाणे धरणातून पाटचारीसाठी १४ कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
येथील काकाजी मंगल कार्यालयात राज्याचे जलसंपदामंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा व जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते जयंत पाटील म्हणाले की, बलदाणे धरणातून पाटचारीसाठी सुमारे १४ कोटी रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे झालेल्या आढावा बैठक घेऊन शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी मंजूर केले. त्यातून धावडे, झिरवे, निमगुळ, टाकरखेडा आदी गावांना लाभ मिळणार आहे.
तर शिंदखेडा मतदार संघ जिंकणे सोपे
शिंदखेडा तालुक्यातील मतदारसंघात मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून संदीप बेडसे यांना शिंदखेडा मतदार संघाचा गड जिंकणे सोपे जाईल. यावेळी सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, सक्षणा सलगर, मेहबूब शेख, रुपाली चाकणकर, संदीप बेडसे यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश आदिक, अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शिंदखेडा मतदार संघाचे क्षेत्र प्रमुख संदीप बेडसे, रणजीत भोसले, माजी आमदार रामकृष्ण पाटील, किरण पाटील, सुनील सोनवणे. सत्यजित सिसोदे, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, शहराध्यक्ष प्रवीण पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष अॅड. एकनाथ भावसार, बापू महाजन, युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, युवती जिल्हाध्यक्ष हिमानी वाघ, युवक शहराध्यक्ष गोलू देसले आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादन ः राजेश सोनवणे