esakal | नंदुरबार, शहादा रुग्णालयात बेड फुल 
sakal

बोलून बातमी शोधा

hospital bed full

बाधितांना शहादा किंवा नंदुरबार येथे जाऊनही बेड मिळत नाहीत. एखाद्या वेळेस बेड उपलब्ध झाला, तर ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही.

नंदुरबार, शहादा रुग्णालयात बेड फुल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शहादा (नंदुरबार) : कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागामध्ये अतिशय वेगाने पसरत असून, शहादा आणि नंदुरबार येथे हॉस्पिटलमध्ये सध्या बेड उपलब्ध नाहीत. यामुळे वडाळी किंवा जयनगर (ता. शहादा) येथे स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी महात्मा जोतिबा फुले युवा मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतिलाल टाटिया, युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी यांनी प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 
जयनगरसह वडाळी, कोंढावळ निंभोरे, बामखेडा, कुकावल, कोठली या गावांमध्येही बाधितांची संख्या वाढत आहे. बाधितांना शहादा किंवा नंदुरबार येथे जाऊनही बेड मिळत नाहीत. एखाद्या वेळेस बेड उपलब्ध झाला, तर ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. कोंढावळ येथील शंभरच्या जवळपास रुग्णांवर शहादा व नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत. जयनगर, वडाळी, निंभोरे, कुकावल येथील अनेक बाधित रुग्णांमुळे बेड मिळत नसल्यामुळे सुरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागत आहेत. 

वेळेवर रूग्‍णवाहिका नाही
खासगी रुग्णालयातील खर्च मजूर व शेतकऱ्यांना परवडणारा नाही. विशेष म्हणजे या गावातील रुग्ण खूपच सिरिअस आहेत, त्यांना शहादा किंवा नंदुरबार येथे घेऊन जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका पोचत नसल्यामुळे रुग्णांचे खूप हाल होत आहेत. यासाठी जयनगर किंवा वडाळी येथे ऑक्सिजनच्या सोयीसह स्वतंत्र कोविड सेंटर उभारल्यास जयनगर-वडाळी पंचक्रोशीतील ४० ते ५० गावांमधील बाधितांवर उपचार करणे सोयीचे होणार असल्याचे महात्मा जोतिबा फुले मंचातर्फे सांगण्यात आले. 

loading image