esakal | वधूपित्याचा जीव पुन्हा टांगणीला; अनेक लग्न सोहळे होताय रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

सगळी हौसमौज, उत्साह बाजूला ठेवला होता. यामुळे वधू-वर नाराज होते. वधूपित्याला आपल्या मुलीचा विवाह सोहळा धूमधडाक्यात व्हावा ही इच्छा मनोमन होती. परंतु कोरोनामुळे काहीच जमले नाही.

वधूपित्याचा जीव पुन्हा टांगणीला; अनेक लग्न सोहळे होताय रद्द

sakal_logo
By
राजू शिंदे

ब्राह्मणपुरी (नंदुरबार) : गेल्या वर्षी २२ मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीने सर्व लग्न सोहळे, कार्यक्रम रद्द, तर कुठे सीमित साध्या पद्धतीने करण्याची वेळ आली होती. यंदा पुन्हा शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रकोप वाढल्याने भीती वाढली असताना प्रशासनाकडून विविध निर्बंध लावले. यामुळे सद्यःस्थितीत सुरू असलेल्या विवाह सोहळ्यातील वधूपित्याला मात्र नाहक चिंता लागली असून, त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 
गतवर्षी कोरोना काळात टाळेबंदीमुळे अनेक लग्न सोहळे रद्द झाले होते. यामुळे लग्नासाठी केलेल्या सर्व तयारीवर पाणी फेरले होते. सगळी हौसमौज, उत्साह बाजूला ठेवला होता. यामुळे वधू-वर नाराज होते. वधूपित्याला आपल्या मुलीचा विवाह सोहळा धूमधडाक्यात व्हावा ही इच्छा मनोमन होती. परंतु कोरोनामुळे काहीच जमले नाही. ठरलेल्या तिथी पुढे ढकलल्या. दिवाळीनंतर यातील बरेच लग्न सोहळे साध्या पद्धतीने उरकून घेतले. उर्वरित लग्नकार्य आता पुन्हा सुरू होताच गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाकडून अनेक नियम व निर्बंध घालण्यात आले. त्यात पुन्हा मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, जमावबंदी टाळणे यांसह रात्रीचे घातलेले निर्बंध यामुळे पुन्हा एकदा नियोजित विवाह सोहळ्यांबाबत वधूपित्याचा जीव टांगणीला लागला आहे. 

लॉकडाउन लागले तर
आता मार्चमध्ये असलेल्या लग्नतिथी व विविध कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने संकट निर्माण झाले आहे. यामुळे वर्षभराच्या कालावधीत पुन्हा कोरोनामुळे वधूपित्यांसह अनेकांचा जीव टांगणीला लागला असून, सर्वसामान्यांना पुन्हा लॉकडाउन लागून घरी बसावे लागणार की काय? असा प्रश्न आहे. 
 
ऐन लग्न सोहळ्यात कोरोनाची धास्ती 
दोन महिन्यांपासून कोरोनाची धास्ती लग्न सोहळ्यात कमी झाल्याची दिसून आली होती. त्यामुळे नागरिकांच्या दुर्लक्षामुळे मास्क वापरणे बंद झाले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागण्याने नाइलाजाने प्रशासनाला लग्न सोहळ्यासह इतर कार्यक्रमांत निर्बंध लावले. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image